पेट्रोल, डिझेल दरवाढी विरोधात ठाण्यात मनसेची निदर्शने

बंद बाईक हातगाडीवर ठेऊन शहर अध्यक्ष रवींद्र मोरे यांच्या नेतृत्वाखाली केेला निषेध

ठाणे : चिनी वस्तूंच्या विरोधात आक्रमक भूमिका घेणाऱ्या मनसेने ठाण्यात आता पेट्रोल आणि डिझेल दरवाढीच्या विरोधात जोरदार निदर्शने केली आहेत. शहरातील तीन पेट्रोल पंप, कापूरवाडी येथील पेट्रोल पंप तसेच इटर्निटी मॉलच्या परिसर अशा एकाच वेळी तीन ठिकाणी मनसेच्या कार्यकर्त्यांनी निदर्शने करून केंद्र सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली. तर तीन पेट्रोल पंपच्या ठिकाणी बंद बाईक एका हातगाडीवर ठेऊन हातगाडीला धक्का मारत सरकारचे लक्ष वेधण्याचा प्रयन्त केला.
ठाण्यात दोन दिवसांपूर्वी मनसेच्या वतीने आंदोलन करण्यात आले होते. यामध्ये चिनी मोबाइल तसेच इतर वस्तूंची तोडफोड करत घोडबंदर येथील वनप्लसचे शोरूम देखील बंद पाडण्यात आले होते. तर आता पेट्रोल आणि डिझेलच्या वाढत्या दरवाढीच्या विरोधात मनसे आक्रमक झाली आहे. शहर अध्यक्ष रवींद्र मोरे यांच्या नेतृत्वाखाली तीन पेट्रोल पंपच्या ठिकाणी अनोख्या पद्धतीने आंदोलन करत बंद बाईक हागडीवरून ठेऊन या हातगाडीला धक्के मारत सरकारचा निषेध केला. दुसरीकडे कापूरबावडी पेट्रोल पंपावर देखील मनसेचे पदाधिकारी महेश कदम आणि कार्यकर्त्यांनी पंतप्रधान मोदींच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली. दारू पेक्षा तेल महाग केले असल्याच्या घोषणा देत मोदी सरकारचा यावेळी निषेध केला . तर इटर्निटी मॉल या ठिकाणी देखील आंदोलन करण्यात आले.
गेल्या १७ दिवसांत पेट्रोल ९ रुपयांनी तर डिझेलमध्ये १० रुपयांनी वाढ झाली आहे. गेल्या तीन वर्षात पेट्रोल आणि डिझेलच्या माध्यमातून सरकारला ११ लाख कोटींचा फायदा झाला आहे. मग हा सर्व पैसा गेला कुठे ? असा प्रश्न शहर अध्यक्ष रवींद्र मोरे यांनी उपस्थित केला. लॉकडाऊनच्या काळात लोकांच्या नोकऱ्या गेल्या, त्यांना दिलासा देण्याच्या ऐवजी हे सरकार नागरिकांचे कंबरडे मोडत असून यापुढे मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्या आदेशाने आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशारा रवींद्र मोरे यांनी दिला आहे.

 528 total views,  1 views today

Leave a Reply

Your email address will not be published.