चिखलोली येथे ५०० खाटाचे कोव्हीड हॉस्पिटल

पालिकेला लोकसहभागाची साथ : डॉ. राकेश बक्षी यांचे मोठे योगदान


अंबरनाथ : अंबरनाथ शहरात कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत असून मृत्यूचेही प्रमाण वाढत असल्याने कोरोना रुग्णांना वेळेत योग्य उपचार मिळावेत यासाठी खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या नेतृत्वाखाली अंबरनाथमध्ये कोव्हीड रुग्णालय उभारण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न करण्यात आले आणि बघता बघता अवघ्या काही दिवसात अंबरनाथ शहराच्या पश्चिम भागातील चिखलोली येथील बंद पडलेल्या डेंटल कॉलेज इमारतीमध्ये ५०० खाटाचे कोव्हीड हॉस्पिटल उभारण्यात आले. हे रुग्णालय उभारणीला सर्वात मोठी साथ मिळाली ती लोक सहभागाची. अंबरनाथमधील डी के फार्मा कंपनीचे मालक आणि फ्लॅग मॅन उपाधी मिळालेले डॉ. राकेश बक्षी यांचे मोठे योगदान या रुग्णालयाला लाभले आहे.
डॉ. राकेश बक्षी यांनी देशातील अनेक शहरात १२० फुट उंचींचे तिरंगा ध्वज उभारले आहेत, असाच एक तिरंगा ध्वज त्यांनी अंबरनाथ शहरातही नगरपरिषदेच्या संमतीने उभारला आहे. त्यांच्या याच आगळ्या देशभक्ती साठी त्यांना फ्लॅग मॅन म्हणून उपाधी देखील मिळाली आहे. सद्या अंबरनाथमध्ये कोरोनाचे रुग्ण वाढत असल्याचे पाहून पालिका उभारत असलेल्या कोव्हीड हॉस्पिटलसाठी त्यांनी ५० बेड ऑक्सिजन व्यवस्थे सोबत त्यात दोन बेड हे आयसीयू प्रकारातील आहेत. एवढेच नाही तर त्यांनी आपले मित्र प्रेम यांना देखील ५० बेड देण्यासाठी उद्दिक्त केले. डॉ. राकेश बक्षी यांच्याप्रमाणे शहरातील उद्योजिका सौ. सुमती पाटील, शिवसेना शहर प्रमुख अरविंद वाळेकर, इंडियन बँक अश्या काही नागरिकांनी या रुग्णालयासाठी आपले योगदान दिले आहे.
मुख्याधिकारी श्रीधर पाटणकर आणि प्रशासक जगतसिंग गिरासे यांनी कोव्हीड रुग्णालयासाठी मोठे परिश्रम घेतले असून त्यांनी अनेक दानशूर व्यक्तींना आवाहन केल्याने कोव्हीड रुग्णालय उभारणीला लोकांचा उत्तम प्रतिसाद मिळाला आहे. नुकतेच पालकमंत्री एकनाथ शिंदे आणि खासदार डॉ श्रीकांत शिंदे यांनी कोव्हीड रूग्णालयाला भेट दिली व पालिका प्रशासनाचे कौतुक केले.
येत्या दोन ते तीन दिवसात हे रुग्णालय रुग्णांसाठी सज्ज असणार असल्याचे सांगण्यात येते. यावेळी आमदार डॉ बालाजी किणीकर, शिवसेना शहर प्रमुख अरविंद वाळेकर, माजी नगराध्यक्ष सुनील चौधरी, उद्योजक गुणवंत खिरोदिया, एड. निखिल वाळेकर, सुभाष साळुंके आदी उपस्थित होते.

 560 total views,  2 views today

Leave a Reply

Your email address will not be published.