भाजपा नेते आमदार अँड आशिष शेलार
मुंबई : आपण मागे पडतोय,अन्याय होतोय,ही भावना महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांमध्ये निर्माण होईल,याची काळजी करुन मुख्यमंत्र्यांनी केंद्राकडे परिक्षांबाबत सल्लामसलत केली. आम्ही जे प्रश्न उपस्थितीत केले होते त्यातून मांडलेली हीच “पालकत्वाची” काळजी अखेर मुख्यमंत्र्यांच्या ध्यानात आली.
आता गाडी रुळावर येऊ लागलेय तरी प्रश्न उरतोच…निर्णय कधी होणार? ATKT असलेल्या ४०% विद्यार्थ्यांचे काय करणार? आधी घोषणा, मग गृहपाठ.. असे का झाले?
घोषणा करण्यासाठी सत्ताबाह्य कुठल्या युवा संघटनेचा दबाव होता का?
उच्च शिक्षण मंत्र्यांमुळे ही नामुष्की आली का? “देशात परिक्षांबाबत समान सुत्र हवे” हे आता सुचले?
मग…आदि(त्य) चालले होते ते कुणाचे, कशासाठी चोचले? सरकारच्या लक्षात असू द्या..महाराष्ट्रातील सुमारे दहा लाख विद्यार्थीच्या आयुष्याला हे टोचलंय.
516 total views, 1 views today