दहावी, बारावीचे निकाल जुलैमध्ये

जुलैच्या दुसऱ्या आठवड्यात बारावीचा तर जुलै अखेरीस दहावीचा निकाल

मुंबई : राज्यात कोरोना आणि त्यानंतर सुरु झालेल्या लॉक डाऊनमुळे दहावी आणि बारावीच्या पेपर तपासणीला उशीर झाला. मात्र आता पेपर तपासण्याची परिस्थिती आटोक्यात आली असून जुलैच्या दुसऱ्या आठवड्यात पर्यंत बारावीचा आणि जुलैच्या अखेरीस दहावीचा निकाल जाहीर केला जाईल अशी माहिती शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी आज दिली.
शैक्षणिक वर्षाच्या सुरुवातीला गायकवाड यांनी व्हीडिओ कॉन्फरन्सद्वारे एक पत्रकार परिषद घेऊन या संदर्भातील माहिती दिली.
राज्यात अनेक ठिकाणी लॉकडाऊन स्थितीमुळे दहावी-बारावीच्या उत्तरपत्रिका तपासणीवर मोठा परिणाम झाला होता. विशेषत: मुंबई, पुणे सारख्या शहर आणि परिसरात रेड झोनमध्ये उत्तरपत्रिका तपासणीसाठी मोठ्या अडचणी आल्या.
होत्या. अनेक विषयांच्या उत्तर पत्रिकाचे गठ्ठे शाळा आणि पोस्ट ऑफिसमध्ये पडून होते. यामुळे उत्तरपत्रिका तपासण्यासाठी चा जो दोन महिन्याचा कालावधी होता तो वाया गेला. आता लॉक डाऊन संपल्यानंतर राज्य शिक्षण मंडळाच्या सर्वच विभागाने पोस्टाच्या मदतीने दहावी आणि बारावीच्या उत्तरपत्रिका काम करणाऱ्या शिक्षकांपर्यंत पोहचवल्या आहेत. असून ज्या उत्तरपत्रिकांची तपासणी झालेली आहे त्या जमा करून घेतल्या आहेत. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचा बारावीचा निकाल जुलैच्या दुसर्या आठवड्यापर्यत लावण्याच्या तयारीत आहे. तर त्यानंतर अखेरी दहावीचा निकाल जाहीर होईल अशी माहिती शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी दिली.

 434 total views,  1 views today

Leave a Reply

Your email address will not be published.