लोकलमधील अत्यावश्यक सेवेतील प्रवाशांच्या गर्दीमुळे कोरोना वाढण्याची दाट चिन्हे
ठाणे : कोरोनामुळे अत्यावश्यक सेवेतील कर्मचारी यांच्याकरिता लोकल सेवा सोमवार पासून सुरू करण्यात आल्या आहेत. सोमवारी पहिला दिवस असल्याने कमी प्रमाणात अत्यावश्यक सेवेतील प्रवाशांनी प्रवास केला. पण मंगळवार सकाळ पासून कर्मचाऱ्यांचा प्रवास सुरु झाला. पण डब्यामध्ये होत असलेली गर्दीमुळे सोसिएल डिस्टन्सचा मोठा फज्जा उडत आहे. याकडे रेल्वे प्रशासनाने लक्ष देणे आवश्यक असून गर्दी न होता सोसिएल डिस्टन्स द्वारे प्रवाशांचा प्रवास होणे आवश्यक असल्याचे सेंट्रल रेल्वे सल्लागार समितीचे माजी सदस्य अमोल कदम यांनी सांगितले.
महत्वाच्या रेल्वे स्टेशन येथे प्रवाशांची थर्मल चेकिंग द्वारे तसेच ओळखपत्र तपासणी करण्यात येऊन नंतर मग प्रवाशांना लोकल पकडता येत आहे. पण या तपासणी करिता प्रवाशांची मोठी रांग लागत असून प्रवाशांना रांगेचा प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. दर पंधरा मिनिटाला लोकल धावत आहेत. यामुळे घरी परतण्याचा वेळी मंगळवारी लोकल डब्यात प्रवाशांची गर्दी झाल्यामुळे सीसीएल डिस्टन्सचा मोठा फज्जा उडत आहे. अजूनही ठाणे जिल्ह्यातील तसेच मुंबई उपनगरातील ग्रामीण भागात कोरोना पोहोचला नाही, लोकल गर्दीमुळे गावोगावी कोरोना पोहोचेल, यामुळे डब्यातील गर्दी कशी कमी होईल. याकडे रेल्वे प्रशासनाने लक्ष देणे आवश्यक असल्याचे सेंट्रल रेल्वे सल्लागार समिती माजी सदस्य अमोल कदम यांनी सांगितले आहे.
640 total views, 1 views today