भारतीय बाजारात घसरणीचा ट्रेंड

निफ्टी १.६० % तर सेन्सेक्स ५५२ अंकांनी घसरला

मुंबई : भारतीय अर्थव्यवस्थेवरील कोव्हिड-१९ची पकड अधिक पक्की होत असताना भारतीय शेअर बाजाराने सोमवारी नुकसान सहन केले. एसअँडपी बीएसई सेन्सेक्स १.६३% किंवा ५५२ अंकांनी घसरून ३३,२२८.८० अंकांवर पोहोचला. तर निफ्टीही घसरून १.६०% किंवा १५९ अंकांनी खाली आला. तो ९,८१३.७० अंकांवर पोहोचल्याचे एंजल ब्रोकिंग लिमिटेडचे प्रमुख सल्लागार अमर देव सिंह यांनी सांगितले.

गेल (३.६८%), विप्रो (२.६०%), एचसीएल टेक्नोलॉजीस (१.४९%), रिलायन्स इंडस्ट्रीज (१.४८%) आणि सन फार्मा (०.८४%) हे आजच्या सत्रातील बाजारातील टॉप गेनर्स ठरले. तर दुसरीकडे इंडसइंड बँक (७.२०%), अॅक्सिस बँक (४.४९%), टाटा मोटर्स (४.४२%), बजाज फायनान्स (३.९३%) आणि एनटीपीसी (३.७२%) हे टॉप लूझर्समध्ये समाविष्ट होते.

सोमवारच्या सत्रात सोन्याच्या किंमतीही घसरल्या. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेतील संसर्गामुळे गुंतवणूकदारांच्या जोखिमीच्या भूकेवर परिणाम होत असूनही आठवड्यापेक्षा जास्त काळापासून डॉलरच्या किंमती उच्च स्थानी आहेत.

भारतीय निर्देशांकातील कमकुवत भावनांमुळे भारतीय चलनाची घसरण झाली. भारतीय रुपया अमेरिकी डॉलरसमोर ७६.०३ रुपयांवर थांबला. एप्रिल २०२० पासूनची भारतीय रुपयाची ही सर्वात मोठी घसरण ठरली.

युरोपियन बाजारपेठेनेही कोरोना व्हायरसमुळे उद्भवलेल्या साथीतच्या चिंतेने तीव्र घसरण अनुभवली. कोव्हिड-१९च्या रुग्णांची संख्या वाढत असूनही अमेरिकी अर्थव्यवस्थेने लॉकडाउन शिथिल केले. एफटीएसई १०० चे शेअर्स १.१८% नी घसरले. एफटीएसई एमआयबी हे ०.९०%, निक्केई २२५ हे ३.४७% आणि हँग सेंगचे शेअर्स २.१६% नी घसरले. नॅसडॅकने आज हिरव्या रंगात व्यापार करत १.०१ टक्क्यांची वृद्धी दर्शवली.

 338 total views,  1 views today

Leave a Reply

Your email address will not be published.