राष्ट्रवादी काँग्रेसचा वर्धापन दिन वेगळ्या पद्धतीने साजरा

रक्तदान, धान्य वाटप आणि मान्यवरांचा सत्कार

बदलापूर : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा एकविसावं वर्धापन दिन बदलापूर शहरात आगळ्या वेगळ्या पद्धतीने साजरा करण्यात कोरोना संचार बंदीच्या पार्श्वभूमीवर हा वर्धापन दिन साजरा करताना रक्तदान शिबीर, कुटुंबाना धान्य वाटप आणि कोरोनाशी लढत देण्यात महत्वाची भूमिका पार पडणाऱ्या विविध क्षेत्रातील २१ मान्यवरांचा विशेष सत्कार करण्यात आला. प्रदेश चिटणीस कालिदास पुढाकाराने हा कार्यक्रम पार पडला. विशेष म्हणजे पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी स्वतः रक्तदान केले.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष वर्धापन दिनानिमित्त बदलापूर शहरात ठाणे राष्ट्रवादी काँग्रेस आणि महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेस चिटणीस कालिदास देशमुख ह्यांच्या सहकार्य ने शहरातील आदिवासी भागातील विधवा माता, भगिनी ह्यांना मोठ्या प्रमाणात धान्य वाटप करण्यात आले. २१ व्या वर्धापन दिनाचे औचित्य साधून कोरोना संचार बंदीच्या काळात ज्या लोकांनी समाज सेवा, गोरगरिबांना मदतीला धावून गेले अशा डॉक्टर, पोलीस यंत्रणा, आरोग्य विभाग, अग्निशमक विभाग, पत्रकार, अशा २१ लोकांना प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले, कोरोना योद्धा म्हणून वरिष्ठ पोलीस निरीक्षक लक्ष्मण सारिपुत्र, वरिष्ठ पोलीस निरीक्षक गणेश देशमुख, ग्रामीण चे पोलीस निरीक्षक संदीप निगडे, पालिका अग्निशमन अधिकारी भागवत सोनोने, दृष्टी मित्र साकिब गोरे आदी २१ मान्यवरांना सन्मानित करण्यात आले.
राष्ट्रवादी काँग्रेस प्रदेशच्या सूचनेनुसार ह्या वर्षी रक्तदान शिबिर घेण्यात आले. डोंबिवली येथील चिदानंद ब्लड बँकेच्या सहकार्याने हे रक्तदान शिबीर यशस्वी करण्यात आले. राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी हेमंत येशवंतराव, सायली बलिद, तुषार बलीद, दिनेश धुमाळ आदींनी रक्तदान केले
अनिसा खान, हेमंत येशवंतराव, दिनेश धुमाळ, धुमाळ ताई, तुषार बलिद, सायली बलिद विद्या बैसणे, ज्योती वैद्य, आदी पदाधिकाऱ्यांनी कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी परिश्रम घेतले.

 355 total views,  1 views today

Leave a Reply

Your email address will not be published.