महापालिका तक्रारींना दाद देत नसल्याने नागरिकांची महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडे धाव
ठाणे शहर अध्यक्ष रवींद्र मोरे यांच्या नेतृत्वाखाली मनसैनिक उतरले नाल्यात
ठाणे : पावसाळ्यापूर्वी नालेसफाई पूर्ण होत नसल्याने दर वर्षी ठाण्यात विविध ठिकाणी पाणी तुंबण्याच्या घटना घडत असतात. पावसाळ्यात मुसळधार पाऊस झाल्यास परिसरातील तुंबलेल्या नाल्यामुळे आसपासच्या वसाहतींत पाणी शिरण्याची शक्यता नागरिकांकडून वर्तवण्यात येत आहे. महापालिकेकडे नालेसफाई करण्याची मागणी करत असतांनाही पालिकेकडून दुर्लक्ष होत असल्याचे दिसून येते. मनसे कार्यालयात नागरिकांच्या तक्रारी आल्यानंतर आज, ११जून रोजी मनसे ठाणे शहर अध्यक्ष रवींद्र मोरे यांच्या नेतृत्वाखाली,ठाण्यातील गोकुळ नगर येथील नाल्यामध्ये उतरत नालेसफाई संदर्भात आंदोलन केले. लवकरात लवकर नालेसफाई करण्यात यावी; अन्यथा उग्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा मनसेने दिला आहे.
या प्रसंगी मनसे ठाणे शहर अध्यक्ष रवींद्र मोरे यांच्यासह ठाणे शहर सहसचिव राजेश तांबे, प्रभाग सचिव संदीप नलावडे उपविभागीय अध्यक्ष वसंत सतोस्कर , शाखाध्यक्ष मयुर सुतार , तुषार सडाके , संज्योत परदुले विशाल घाग,उपशाखाद्यक्ष दिपेश केळुस्कर , ज्ञानेश भानुशाली , मोनिष कळसेकर ,गोकुळ नगर येथील रहिवाशी उपस्थित होते. नाल्याचे काम उद्या पासून चालू होत आहे . JCB च्या सहाय्याने काम करणार असे नगर पालिका अधिकारी व कंत्राटदार यांनी सांगितल्या नंतर आंदोलन मागे घेण्यात आले .
443 total views, 1 views today