शैक्षणिक सुविधांचा वापर होणार नसेल तर फि कमी करावी

पूर्व प्राथमिक ते १२ वी पर्यंतच्या शाळा, महाविद्यालयांना शालेय शिक्षण विभागाचे आदेश

मुंबई : कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी लागू करण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे अनेकांची आर्थिक परिस्थिती अडचणीत आली आहे. यापार्श्वभूमीवर शैक्षणिक वर्ष २०२०-२१ या शैक्षणिक वर्षात शाळा महाविद्यालयांच्या शैक्षणिक सुविधांचा वापर होणार नसेल आणि त्याबाबतचा खर्च फि मधून कमी होणार असेल तर तो खर्च पालकांबरोबरील (EPTA) कार्यकारी समितीत ठराव करून शैक्षणिक फि कमी करावे असे आदेश शालेय शिक्षण विभागाकडून नुकताच जारी करण्यात आला.
लॉकडाऊनमुळे आर्थिक समस्येला सगळ्यांनाच सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे राज्यातील अनेक शाळा-महाविद्यालयांनी परस्पर फि वाढवित आहेत. तसेच वार्षिक फि एकदम भरण्यासाठी पालकांना बाध्य करत असल्याबाबतच्या तक्रारी राज्य सरकारकडे येत आहेत. त्यामुळे शाळा महाविद्यालयांनी फि वाढ करू नये तसेच पालकांना मासिक किंवा त्रैमासिक पध्दतीने फि भरण्याची मुभा देत त्यांच्यासमोर ऑनलाईन फि भरण्याची सुविधाही उफलब्ध करून द्यावे अशी सूचनाही सर्व शाळा-महाविद्यालयांना करण्यात आली आहे.
हे आदेश सर्व बोर्डांच्या, सर्व माध्यमांच्या व पूर्व प्राथमिक ते १२ वी पर्यतच्या सर्व शाळा, महाविद्यालयांसाठी देण्यात आला आहे. या आदेशाचे उल्लघंन करणाऱ्या शाळांवर राज्य सरकारकडून कारवाई करण्याचा इशारा देण्यात आल्याची आठवणही शालेय शिक्षण विभागाने यानिमित्ताने करून दिली.

 322 total views,  1 views today

Leave a Reply

Your email address will not be published.