पावसाळी अधिवेशन १ दिवसाचे होवू शकते

मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांची माहिती

मुंबई : विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन २२ जूनला होणार होते. मात्र मुंबईसह राज्यातील कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता हे अधिवेशन ३ ऑगस्टपासून मुंबईत होणार आहे. हे अधिवेशन किती चालेला याबाबत परिस्थिती पाहून निर्णय घेण्यात येणार असल्याचे सांगत पुरवणी मागण्यांसाठी एक दिवसाचे अधिवेशन होवू शकते अशी माहिती मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी दिली.
रायगड येथील चक्रीवादळामुळे झालेल्या नुकसानीच्या पार्श्वभूमीवर आणि विधिमंडळ कामकाज सल्लागार समितीत झालेल्या बैठकीतील माहिती देण्यासाठी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
याआधी पावसाळी अधिवेशन २२ जूनपासून सुरू होईल असं जाहीर करण्यात आले होते. पण ३० जूनपर्यंत सर्व रेल्वे आरक्षण रद्द झाल्याने राज्याच्या कानाकोपऱ्यातून आमदार व त्यांचे कर्मचारी मुंबईत कसे येणार, करोनाच्या काळात ही गर्दी करायची का असे प्रश्नही समोर होते. त्यामुळे विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन पुढे ढकलण्याबाबत विचार सुरू होता.

 462 total views,  1 views today

Leave a Reply

Your email address will not be published.