सर्जेराव माहुरकर यांचा उपक्रम
अंबरनाथ : अंबरनाथ शहरात कोरोनाचा वाढत प्रादुर्भाव लक्षात घेऊन या कोरोना विषाणू चा प्रादुर्भाव रोखण्यासाठी, प्रभागातील नागरिकांचे आरोग्य सुरक्षित ठेवण्यासाठी हॅन्ड सॅनिटायझर व मास्क चे सुमारे १००० कुटुंबाना सर्जेराव माहुरकर यांचे मार्फत वाटप करण्यात आले.
येथील वडवली दत्तमंदिर परिसर सह, अंतर्गत येणारे प्रसन्न लेन, बाँबे हाऊस, वर्षा कॉम्प्लेक्स, शहिद मुरलीधर चौधरी मार्ग, ताडवाडी व अन्य सोसायट्यातील नागरिकांना कोरोना विषाणू चा प्रादुर्भाव रोखण्यासाठी, प्रभागातील नागरिकांचे आरोग्य सुरक्षित ठेवण्यासाठी हॅन्ड सॅनिटायझर व मास्क चे वाटप करण्यात आले. सर्जेराव माहुरकर यांचे मार्फत या साहित्याचे वाटप करण्यात आले. यावेळी प्रमुख कार्यकर्ते राजेंद्र कुलकर्णी, जॉन एलेक्स, कैलास जाधव, विजय पोखरकर, विजय जाधव, मेहुल जाधव, अभिजीत सोलंकी, महेश तावरे, प्रदीप पाटील, किरण गायकवाड, गिरीष बोरसे, प्रमोद जगताप, राजेश मगर यांचे मोलाचे योगदान लाभले.
561 total views, 1 views today