“निसर्ग”ची किमया : दोन दिवसांपासून गढूळ पाण्याचा पुरवठा

बॅरेज धरणातील पाणी गढूळ होत असल्यानें अशुद्ध पाण्याचा पुरवठा झाल्याचे महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांचे मत

बदलापूर : बदलापूर पालिका हद्दीत गेल्या दोन दिवसांपासून गढूळ पाण्याचा पुरवठा होत आहे. बदलापूर शहराला महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाकडून पाणीपुरवठा केला जातो. बदलापूर पश्चिमेला असलेल्या उल्हास नदीवर बॅरेजे बंधाऱ्यावर महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या जलशुद्धीकरण केंद्रातून बदलापूर शहर आणि अंबरनाथ तसेच अंबरनाथ येथील ऑर्डनन्स फॅक्टरी ला देखील पाणीपुरवठा केला जातो. मात्र बदलापूर शहरात गेल्या दोन दिवसांपासून गढूळ पाण्याचा पुरवठा होत असल्याने नागरिकांं मध्येेे चिंतेचे वातावरण आहे.
सध्या कोरोनाचा संसर्ग बदलापूर शहरात वाढत असल्यामुळे या गढूळ पाण्याने नागरिक आजारी पडण्याची भिती नागरिकांमध्ये आहे. गढूळ पाण्यामुळे नागरिकांना जुलाब व इतर जलजन्य आजार होण्याची भीती असल्याने महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाने यातील तांत्रिक दोष तातडीने दुरुस्त करून बदलापूर शहराला स्वच्छ आणि निर्मळ पूर्वीसारखा पाणीपुरवठा सुरळीत करावा अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.
निसर्ग वादळामुळे सर्वत्र पडझड झाली आहे. रायगड जिल्ह्यात पडलेल्या पावसामुळे उल्हासनदीत सोडण्यात येणारे आंद्रा धरणातील पाणी गढूळ येत होते. बॅरेज धरणातून होणारे पाणी हे गेल्या दोन-तीन दिवसात गढूळ होत होते. मात्र येत्या एक दोन दिवसात नागरिकांना पुन्हा शुद्ध आणि स्वच्छ पाणीपुरवठा करण्यात येईल असे महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे उप विभागीय अभियंता सुहास मगदूम यांनी सांगितले.

 404 total views,  1 views today

Leave a Reply

Your email address will not be published.