कायदेविषयक शिक्षण डिजीटल मंच ‘लॉप्रेन्यूर्झ’चा द्वितीय वर्धापन दिन

भारताच्या कायदेविषयक शिक्षण यंत्रणेचा चेहरा बदलण्यासाठी प्रयत्नशील

मुंबई : लॉप्रेन्यूर्झ हा भारताचा पहिला कायदेविषयक शिक्षण डिजीटल मंच असून १९ जून रोजी द्वितीय वर्धापन दिन साजरा करत आहे. हा मंच सुरू झाल्यापासून भारतातील कायदे क्षेत्राकरिता परिस्थितीत आमूलाग्र बदल घडवून आणण्यात मोलाची भूमिका बजावत आहे. डिजीटल मंचावर कायदे विषयक शिक्षणात बदल घडवून आणण्याच्या या प्रवासात लॉप्रेन्यूर्झ’ला समस्त कायदा क्षेत्रातून विधी ग्राह्यता प्राप्त झाली. तसेच त्यांचा प्रामणिक वर्गणीदार समूह निर्माण झाला. परिणामी, लॉप्रेन्यूर्झ हा मंच भारताच्या कायदेविषयक शिक्षण यंत्रणेचा चेहरामोहरा बदलण्याच्या प्रयत्नात दिसून येतो.

लॉप्रेन्यूर्झद्वारे विद्यार्थ्यांना वकिली व्यवसायाची मुलभूत तत्त्वे तसेच हे क्षेत्र नीट जाणून घेण्यासाठी मदत करण्यात येते. व्हीडिओ व्याख्याने, नोट्स, एकीकृत स्काईप सुविधा आणि सोडवलेल्या प्रश्नोत्तरांच्या साह्याने कोणत्याही वेळी क्षेत्रात काम करणा-या व्यावसायिकांकडून मार्गदर्शन करण्यात येते. लॉप्रेन्यूर्झद्वारे विद्यार्थ्यांना स्वत:च्या वेळेनुसार आणि सोयीनुसार शिक्षण घेणे शक्य होते.

लॉप्रेन्यूर्झचे संस्थापक आणि संचालक रौनक कक्कर यांनी सांगितले की ‘मी स्वत: वकिलीचे शिक्षण घेताना आलेल्या अनुभवांची थेट परिणती म्हणजे लॉप्रेन्यूर्झ. ज्याची स्थापना २०१७ दरम्यान झाली. या यंत्रणेवर काम सुरू केल्यावर मला भारतातील कायदेविषयक व्यवसाय कसा चालतो याची नव्याने माहिती झाली. त्यात सुधारणा करण्याकरिता आवश्यक असलेल्या पद्धतींवर विचार करण्यास सुरुवात झाली. तेव्हापासून दोन वर्षांत आम्ही कायदेविषयक अभ्यासाला नवा आकार देण्याच्या दृष्टीने अविरत प्रयत्न सुरू केले. आम्ही १५०० हून अधिक विद्यार्थ्यांना मदत केली असून या मंचावर स्काईप सत्रे तसेच वैयक्तिक अभ्यास अहवाल यांसारखी नवीन वैशिष्ट्ये सादर केली.

लॉप्रेन्यूर्झचा कायम भर हा नवीन वैशिष्ट्ये आणि कार्यक्षमतांवर असून अविरत सुधारणांसाठी कटिबद्ध आहे. आगामी कालावधीत एकंदर न्याय क्षेत्रासाठी पहिलेवहिले वैशिष्ट्य म्हणजे अधिकाधिक विद्यार्थ्यांची मुख्य परीक्षा आणि नवीन कायदे विषयक प्रवेश परीक्षांची ओळख या मंचावर करून देण्यात येणार आहे. या पुढाकारामुळे लॉप्रेन्यूर्झ कायदे-विषयक स्पर्धात्मक परीक्षांकरिता शिक्षणविषयक आमूलाग्र बदलाची परिभाषा नव्याने रचेल

 678 total views,  2 views today

Leave a Reply

Your email address will not be published.