सुल्झर पंप्स इंडियाची शासनाच्या आदेशाला केराची टोपली

कोरोनाबाधित कर्मचाऱ्यांना भरपगारी रजा देण्यास नकार. कर्मचाऱ्यांच्या जीविताशी खेळ

तक्रारीनंतर हि शासकीय यंत्रणा कोमात… कंपनी व्यवस्थापन जोमात

ठाणे : लॉकडाउनच्या काळात शासनाच्या आदेशाने अटी-शर्तीवर कंपन्यांना सुरु करण्याची परवानगी दिली. त्यात सुल्झर पम्प इंडिया प्रा. कंपनी व्यवस्थापनाने १५ एप्रिल पासूनच कंपनी सुरु केली. कर्मचारी वर्ग जीव धोक्यात घालून कंपनीत हजर झाले. मात्र सध्या पाच कोरोनाचे रुग्ण कंपनीत आढळले आहेत. त्या कर्मचाऱ्यांना भरपगारी रजा न देता त्यांच्या सुट्ट्या कापण्याचा मस्तवालपणा व्यवस्थापन करीत आहे. याबाबत कंपनी कर्मचाऱ्यांनी कामगार आयुक्त, जिल्हाधिकारी, मुख्यमंत्री अशा डझनभर संबंधित ठिकाणी होणाऱ्या अन्याया विरोधात तक्रारी केल्या. मात्र शासकीय यंत्रणा कोमात आहेत. तर सुल्झर पम्प व्यवस्थापन मात्र मुजोर आणि जोरात आहे. तर दुसरीकडे कर्मचारी यांच्या जीविताशी खेळ करून शासनाच्या आदेशाची पायमल्ली करण्यात येत आहे.

      १५ एप्रिल पासून कंपनी सुरु करण्याची परवानगी सरकारने दिल्याचे कर्मचारी यांना सांगून सुल्झर पम्प कंपनी सुरु केली गेली. दरम्यान कर्मचारी नोकरी गमावण्याच्या भीतीने जीवाची पर्वा न करता कंपनीत कामाला जात होते.  आज परिस्थिती बदलली आहे. नवी मुंबईस्थित, इंडस्ट्रियल पंपांचे उत्पादन करणाऱ्या सुल्झर पंप्स् मध्ये वन डे क्रिकेटसारखी रोजच्या रोज कोव्हीड- १९ रुग्णांची संख्या वाढत चालली आहे  कंपनीच्या स्टोर्स विभागातील चार कर्मचारी व असेंम्बली डिपार्टमेंट मधील एक अश्या एकूण पाच जणांना कोव्हीड-१९ ची लागण झालेली आहे. त्यांच्या तपासणी नंतर ते पॉझिटिव्ह असल्याचे समोर आले. पाच रुग्ण आढळल्यानंतर इतर कर्मचारी यांच्या कोव्हीड चाचण्या होणे गरजेचे असताना सुल्झर पंप्स् व्यवस्थापन नवी मुंबईतल्या गगनगिरी हाॅस्पिटल या संधान असलेल्या आणि अधिकृत कोव्हीड चाचणी करण्याचा सरकारी परवाना नसलेल्या सेंटरमध्ये ठराविकच जणांच्या चाचण्या करण्यात येत असल्याची माहिती उपलब्ध आहे.  ब्लड टेस्टद्वारे "करोना रॅपिड टेस्ट" करवून त्यांना घाईघाईने चाचण्या करून  कुठल्याही स्थितीत कसंही करुन उत्पादन काढून घेण्याचा राक्षसी प्रकार करत असल्याची चर्चा सगळे कामगार-कर्मचारी वर्गात सुरु आहे. . तसेच, त्याबाबत, सर्व कामगारांनी रीतसर आज (९ जून-२०२० रोजी) कंपनी व्यवस्थापकीय संचालकांना तशी गंभीर तक्रार सादर केलेली आहे. मात्र मस्तवाल कंपनी व्यवस्थापन कुणालाही जुमानत नसून कोरोना बाधितांनी कामावर न आल्यास त्यांच्या असलेल्या सुट्ट्या कापण्यात येतील आणि जर सुट्टी शिल्लक नसतील तर पगार कापण्याचा निष्ठुर निर्णयावर अडून आहेत. शासकीय यंत्रणा कोमात गेलेल्या आहेत. कारवाई होण्याची किंवा जाब विचारणारे नसल्याने कंपनी व्यवस्थापन कर्मचाऱ्यांच्या जीविताशी क्रूर खेळ करीत आहेत. उपचार घ्या नाही तर घेऊ नका, पण कामावर आले तरच पगार मिळेल अन्यथा सुट्ट्या कापणार नाहीतर पगार कापणार अशी ठाम भूमिका ठेवल्याने कामगार युनियन आणि कर्मचारी हे न्यायासाठी सरकारी दरबारी टाहो फोडीत आहेत. मात्र सरकारी यंत्रणा आणि कंपनी व्यवस्थापन कर्मचाऱ्यांची दखल घेत नसल्याचे चित्र दिसत आहे.    

सॅन्डोज आणि मुकुंद कंपनी प्रमाणे सुल्झर पम्प कंपनीची अवस्था?

फक्त सुल्झर पम्प कंपनीत कोरोना बाधित रुग्ण आढळले असे नाही तर यापूर्वीही सॅन्डोज आणि मुकुंद कंपनीत कर्मचारी यांना मोठ्या प्रमाणात कोरोनाची लागण झालेली होती. तेव्हाही कर्मचारी यांच्या जीविताशी खेळ करण्यात आला आणि आता सुल्झर पम्प कंपनीतील कर्मचारी यांचीही अशीच अवस्था असून कर्मचारी हे न्याय हक्कासाठी टाहो फोडीत आहेत.

१५ एप्रिल पासून कंपनी सुरु करण्याची परवानगी सरकारने दिल्याचे कर्मचारी याना सांगून सुल्झर पम्प कंपनी सुरु केली. दरम्यान कर्मचारी बेकारीमुळे जीवाची पर्वा न करता कंपनीत कामाला जात होते. आज परिस्थिती बदलली आहे. नवी मुंबईस्थित, इंडस्ट्रियल पंपांचे उत्पादन करणाऱ्या सुल्झर पंप्स् मध्ये वन डे क्रिकेटसारखी रोजच्या रोज कोव्हीड-१९ रुग्णांची संख्या वाढत चालली आहे कंपनीच्या स्टोर्स विभागातील पाच कर्मचारी याना कोव्हीड-१९ ची लागण झालेली आहे. त्यांच्या तपासणी नंतर ते पॉझिटिव्ह असल्याचे समोर आले. पाच रुग्ण आढळल्यानंतर इतर कर्मचारी यांच्या कोव्हीड चाचण्या

होणे गरजेचे असताना सुल्झर पंप्स् व्यवस्थापन नवी मुंबईतल्या गगनगिरी हाॅस्पिटल या संधान असलेल्या आणि अधिकृत कोव्हीड चाचणी करण्याचा सरकारी परवाना नसलेल्या सेंटरमध्ये चाचण्या करण्यात येत असल्याची माहिती उपलब्ध आहे. “करोना रॅपिड टेस्ट” करवून त्यांना घाईघाईने चाचण्या करून कुठल्याही स्थितीत कसंही करुन उत्पादन काढून घेण्याचा राक्षसी प्रकार करत असल्याची चर्चा सगळे कामगार-कर्मचारी वर्गात सुरु आहे. . तसेच, त्याबाबत, सर्व कामगारांनी रीतसर आज (९ जून-२०२० रोजी) कंपनी व्यवस्थापकीय संचालकांना तशी गंभीर तक्रार सादर केलेली आहे. मात्र मस्तवाल कंपनी व्यवस्थापन कुणालाही जुमानत नसून कोरोना बाधितांनी कामावर न आल्यास त्यांच्या असलेल्या सुट्ट्या कापण्यात येतील आणि जर सुट्टी शिल्लक नसतील तर पगार कापण्याचा निष्ठुर निर्णयावर अडून आहेत. शासकीय यंत्रणा कोमात गेलेल्या आहेत. कारवाई होण्याची किंवा जाब विचारणारे नसल्याने कंपनी व्यवस्थापन कर्मचाऱ्यांच्या जीविताशी क्रूर खेळ करीत आहेत. उपचार घ्या नाही तर घेऊ नका, पण कामावर आले तरच पगार मिळेल अन्यथा सुट्ट्या कापणार नाहीतर पगार अशी ठाम भूमिका ठेवल्याने कारभारी युनियन आणि कर्मचारी हे न्यायासाठी सरकारी दरबारी टाहो फोडीत आहेत. मात्र सरकारी यंत्रणा आणि कंपनी व्यवस्थापन कर्मचाऱ्यांची दाखल घेत नसल्याचे चित्र दिसत आहे.

सॅन्डोज आणि मुकुंद कंपनी प्रमाणे सुल्झर पम्प कंपनी ची अवस्था ?

यापूर्वी सुल्झर पम्प कंपनीत कोरोना बाधित रुग्ण आढळले असे नाही तर यापूर्वीही सॅन्डोज आणि मुकुंद कंपनीत कर्मचारी याना मोठ्या प्रमाणात कोरोनाची लागण झालेली होती. तेव्हाही कर्मचारी यांच्या जीविताशी खेळ करण्यात आला आणि आता सुल्झर पम्प कंपनीतीला कर्मचारी यांचीही अशीच अवस्था असून कर्मचारी हे न्याया हक्कासाठी टाहो फोडीत आहेत. सुल्झर पम्प कंपनी व्यावास्थापनाने कर्मचाऱ्यांची फसवणूकच केली. २० एप्रिल रोजी शासनाने कंपन्या सुरु करण्याची परवानगीसाठी अनुमती दर्शविली. त्याचा अधिकृत पत्र २४ एप्रिलला आले मात्र सुल्झर पम्प कंपनी व्यवस्थापनाने कामगारांना परवानगी १५ एप्रिललाच कंपनी सुरु केली. केवळ प्रोडक्शन निघण्यासाठी कंपनीने कुठल्याही कर्मचाऱ्यांना परवानगी पात्र दाखविले नाही. अन आता कर्मचारी याना कोरोनाची लागण झाल्यानंतर त्यांना वाऱ्यावर सोडण्यात आहे. व्यवस्थापनाच्या या मुजोरपणाचा निषेध कर्मचारी यांच्या सोबतच सामाजिक संस्था आणि युनियनने हि नोंदविला आहे.

 561 total views,  1 views today

Leave a Reply

Your email address will not be published.