राष्ट्रवादी काँग्रेस प्रवक्ते नवाब मलिक यांचे प्रत्युत्तर
मुंबई : लोकशाही मार्गाने चालणार्या सरकारला सर्कस बोलणार्या राजनाथसिंह यांचे ‘अनुभवाचे बोल’ असल्याचे प्रतित्तुर राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते आणि राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांना दिले.
केंद्रीय मंत्री राजनाथसिंह यांनी रिंगमास्टरच्या चाबूकने महाविकास आघाडी सरकार चालवले जात असल्याचे वक्तव्य केले होते.
महाराष्ट्रामध्ये लोकशाही मार्गाने सरकारचे काम सुरू आहे. कोरोना काळात सरकारने केलेल्या कामाचे ICMR ने मुंबई मॉडेलची चांगली स्तुती केली. मात्र असे असताना केंद्रीयमंत्री राजनाथसिंह रिंग मास्टरच्या चाबूकने चालवले जाणारे सरकार असे वक्तव्य करत असल्याचे ते म्हणाले.
529 total views, 1 views today