नियामक आयोगाच्या नियमानुसारच वीज बिल आकारणी – टोरेंट पॉवर

काही जण जाणून बुजून गैरसमज पसरवत असल्याचा कंपनीचा आरोप

ठाणे : लॉक डाऊन सुरू झाल्यावर नियामक आयोग एम.ई.आर.सी. कडून बिलिंगसह विविध कामांसाठी मार्गदर्शक तत्त्वे जारी करण्यात आली. त्यानुसारच ग्राहकांची वीज बील आकारणी करण्यात येत आहे. मात्र काही जण गैरसमज पसरवत असल्याची माहिती टोरेंट पॉवर कंपनीने दिली आहे.

कोविड – १९ साथीच्या लॉकडाउन कालावधी दरम्यान ग्राहकांचे वीज बिल संपूर्ण महाराष्ट्र राज्यासाठी नियामक एमईआरसीने दिलेले २६.०३.२० आणि०९.०५.२० च्या “प्रॅक्टिस डिरेकशन्स” या मार्गदर्शक तत्त्वांवर आधारित आहेत.

नियामक आयोग एम.ई.आर.सी. ने वीजपुरवठा संदर्भात जारी केलेल्या मार्गदर्शक सूचनांच्या आधारे लॉकडाउन निर्बंधामुळे लॉकडाउन कालावधी दरम्यान काही दिवस केवळ वीज पुरवठा चालू ठेवण्याचीच कामे सुरू होती.

त्यानुसार मार्च-२० शेवटी व एप्रिल -२० लॉकडाउन प्रतिबंधांमुळे वाचन शक्य नसून मागील तीन महिन्यांच्या सरासरी वापरा नुसार बिले दिली गेली. तथापि, ग्राहकांचे मे -२० चे बिल हे वास्तविक मीटर वाचनानुसार दिले गेले आहे, जे दोन अथवा तीन महिन्यांच्या कालावधीचे आहे. या बिलात मार्च-२० , एप्रिल -२० चे सरासरी बिल क्रेडिट देखील समायोजित केले गेले आहे. (फिक्स चार्ज व मार्च -२० महिन्याची एफ.ए.सी. चार्ज वगळता). त्याचप्रमाणे, दोन महिन्यांचा लागू स्लॅब चा लाभही मे -२० च्या बिल मध्ये देण्यात आला आहे.

१ एप्रिल -२०२० पासून नवीन टॅरिफ लागू असून १-एप्रिल-२०२० नंतरचे बिल सुधारित दर नुसार बनविले गेले आहे. एप्रिलआणि मे महिन्यात उन्हाळ्यामुळे, बहुतेक ग्राहकांच्या वीज वापरात वाढ होते आणि त्याची तुलना मागील महिन्यांच्या वापराशी (जानेवारी ते मार्च) करणे अयोग्य आहे. तसेच लॉकडाऊनमुळे प्रत्येकजण घरी असल्या कारणाने विजेचा जास्त वापर झाला असून बहुतेक लोकांचा विजेचा खप वाढलेला दिसत आहे.

या कारणांमुळे आपले मे-२० चे बिल जास्त असल्याचे वाटू शकते. तथ्य समजल्याशिवाय, काही लोक ऑडिओ टेप आणि व्हिडिओंद्वारे चुकीची माहिती पसरवित आहेत. टोरेंट पॉवर कंपनीने ग्राहकांना आवाहन केले आहे, त्यांनी कोणत्याही अफवांना बळी पडू नये. टोरंट पॉवर ही महावितरणची फ्रेंचाइजी असल्याने महावितरणने जारी केलेल्या सर्व नियम, मार्गदर्शक तत्त्वांना बंधनकारक आहे व स्वतःचे नियम बनवू शकत नाही

 700 total views,  1 views today

Leave a Reply

Your email address will not be published.