ह.भ.प.रामभाऊ दळवी यांच्या ६० व्या वाढदिवसाचे औचित्यसाधून करण्यात आला उपक्रम
मुरबाड : मुरबाड तालुका पंचायत समिती मुरबाडचे माजी उपसभापती व गोटीरामभाऊ पवार यांचे निकटवर्ती ह.भ.प.रामभाऊ दळवी यांच्या ६० व्या वाढदिवसाचे औचित्यसाधून मुरबाड तालुक्यातील एक लाख लोकांना कोरोनापासून पूर्व काळजी म्हणून रोग प्रतिकार शक्ती वाढावी म्हणून कार्य करणारे सुभाषदादा पवार मिञ मंडळ,शिवसेना मुरबाड तालुका, जि.प.ठाणे उपाध्यक्ष व ठाणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकचे संचालक सुभाषदादा पवार आणि दिपकभाई शहा यांच्या माध्यमातून आर्सेनिक अल्बम-३० या होमिओपॅथिक गोळ्यांचे वाटप केले आहे. या प्रसंगी वाढदिशिरवली आदिवासी वाडीतील महिला पुरुष यांना गोळ्या व भोजन वाटप करण्यात आले.या कार्यक्रमास पंचायत समिती मुरबाडचे उपसभापती अनिल देसले,बाजार समिती मुरबाडचे माजी चेअरमन चंद्रकांत बोष्टे, जि.प.सदस्या प्राजक्ता भावार्थे,खरेदी विक्री संघ मुरबाड संचालक प्रकाश पवार आदी उपस्थित होते.
731 total views, 1 views today