भाजप ग्रामीण मंडळ आणि फ्रेंड्स युनिटी फाउंडेशनच्या वतीने करण्यात आले आहे आयोजन
डोंबिवली : ६ जून शिवराज्याभिषेक दिनानिमित्त भाजप ग्रामीण मंडळ आणि फ्रेंड्स युनिटी फाउंडेशनच्या वतीने रक्तदान शिबीरचे सकाळी ११ ते दुपारी ४ यावेळेत महागणपती सभागृह, गणेश नगर, मानपाडा रोड, डोंबिवली ( पूर्व ) येथे आयोजीत केले आहे. कोविड-१९ महामारीत दरम्यान रक्त तुटवडा भरून काढण्यासाठी हे शिबीर भरवित असल्याचे भाजपा ग्रामीण मंडळ महिला अध्यक्षा मनीषा राणे आणि फ्रेंड्स युनिटी फाउंडेशनच्या सदस्या विशाखा राणे यांनी सांगितले. या शिबिरात जास्तीत जास्त नागरिकांनी उपस्थिती दर्शवून रक्तदान करण्याची विनंती करण्यात आली आहे.
576 total views, 3 views today