‘ आर्सेनिक अल्बम ३०’ होमिओपॅथी गोळ्यांचे मोफत वाटप

भाजप नगरसेविका विद्या म्हात्रे यांच्यावतीने राबवण्यात आला उपक्रम

डोंबिवली : माजी राज्यमंत्री तथा आमदार रवींद्र चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली नगरसेविका विद्या राजेश म्हात्रे व भाजप कल्याण जिल्हा सहचिटणीस राजेश बामा म्हात्रे त्यांनी कल्याण डोंबिवली महानगरपालिका प्रभाग क्र.५९ कान्होजी जेधे मैदान येथील नागरिकांना डॉ.सोनल राजेश जाधव यांच्या मार्फत तयार केलेल्या ‘`आर्सेनिक अल्बम ३०’ या होमिओपॅथी गोळ्यांचे मोफत वाटप केले. नगरसेविका विद्या म्हात्रे व राजेश बामा म्हात्रे यांच्या माध्यमातून वॉर्ड ५९ मधील ओम वृदावन सोसायटी तील गरजू नागरिकांना मोफत अन्नधान्य करण्यात आले. ओम वृदावन रहिवासी संघाने या मदतीसाठी त्यांचे आभार मानले.

 451 total views,  1 views today

Leave a Reply

Your email address will not be published.