कोरोनाविषयी ठाणे पोलीस, गोदरेज प्रॉपर्टीजची जनजागृती

हमारा संकल्प’ चित्रपटाच्या माध्यमातून सजग राहण्याविषयी देत आहेत माहिती

ठाणे : कोरोनाविषाणूच्या विरोधात नागरिकांमध्ये जनजागृती करण्यासाठी ठाणे पोलीस व गोदरेज प्रॉपर्टीज यांनी एकत्र येत ‘हमारा संकल्प’ हा उपक्रम हाती घेतला आहे. शासनाने घालून दिलेल्या नियमांचे कठोरपणे पालन करणे गरजेचे असून नागरिकांमध्ये सजगता आणि जागृती करण्याच्या उद्देशाने त्यांनी ‘हमारा संकल्प’ या चित्रपटाची निर्मिती केली आहे. कोरोनाच्या या युद्धजन्य परिस्थितीत कशापद्धतीने सजग रहावे याविषयीची माहिती या चित्रपटातून देण्यात आली आहे.

टाळेबंदी हटली म्हणजे कोरोना सोबतचे युद्ध संपले असे होत नाही याची जनजागृती या चित्रपटाच्या माध्यमातून केली जाणार आहे. आपल्याला शासनाने घालून दिलेल्या मार्गदर्शक नियमांचे पालन टाळेबंदी संपल्यानंतरही करावे लागणार असल्याचा संदेश या चित्रपटाद्वारे देण्यात आला आहे. ठाणे पोलीस सदैव दक्ष असतात, नागरिकांनी देखील सदैव दक्ष असावे तसेच स्वतःसह कुटुंबियांच्या सुरक्षेसाठी सर्व खबरदारी घ्यावी अशी पोलिसांची अपेक्षा आहे.

पोलीस आयुक्त, विवेक फणसाळकर म्हणाले, “कोरोना विरोधातील युद्ध हे सुरूच राहणार आहे. नागरिकांना स्वतः सोबत दुसऱ्यांच्या आयुष्यासाठी देखील जबाबदार होणे गरजेचे आहे. मास्क घालणे, शारीरिक अंतर पाळणे, वारंवार साबणाने हात धुणे, गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळणे व संसर्ग टाळण्यासाठी शासनाने घालून दिलेल्या मार्गदर्शक नियमांचे पालन करणे अत्यंत गरजेचे आहे”.

गोदरेज प्रॉपर्टीसचे व्यवस्थापकीय संचालक व मुख्य कार्यकारी अधिकारी, मोहित मल्होत्रा म्हणाले, ” कोविड-१९ वैश्विक महामारीचा फैलाव रोखण्यासाठी ठाणे पोलीस करत असलेल्या प्रयत्नात आम्ही त्यांच्या सोबत काम करीत आहोत याचा आम्हाला आनंद आहे. टाळेबंदीच्या काळात नागरिकांच्या सुरक्षेसाठी ठाणे पोलीस अप्रतिम काम करीत असून स्वयंस्फूर्तिने अनेक उपाययोजना राबविल्या आहेत. या युद्धाचा सक्षमपणे सामना करण्यासाठी आम्ही शासनाला सहकार्य करू. आम्ही सर्व नागरिकांना आवाहन करतो की, त्यांनी घरीच रहावे, सुरक्षित रहावे व संसर्ग रोखण्यासाठी शासनाने घालून दिलेल्या मार्गदर्शक नियमांचे पालन करावे”

 454 total views,  1 views today

Leave a Reply

Your email address will not be published.