युनियन बँकेचे पहिल्याच दिवशी १४ हजारांपेक्षा जास्त इमर्जन्सी क्रेडिट मंजूर

सध्याच्या संकटकाळात सर्व एमएसएमई,बिझनेस युनिट्सना साथ देईल आणि त्यांना आवश्यक तो आधार बँक देणार

मुंबई : सरकारच्या उपक्रमानुसार, युनियन बँक ऑफ इंडियाने मुद्रा लाभधारक,एमएसएमई, बिझनेस युनिट्सना त्यांच्या लिक्विडिटी संकटावर मात करण्यासाठी पात्रतेनुसार, युनियन गॅरंटीड इमर्जन्सी क्रेडिट लाइन (यूजीईसीएल) सुरू केली आहे. समाजातील निम्न स्तरावरील लोकांच्या अडचणी कमी करण्याचा प्रयत्न या योजनेद्वारे केला जाईल.

युनियन बँक ऑफ इंडियाने पहिल्याच दिवशी म्हणजे १ जून रोजी १४०० अधिक खाती मंजूर केली. यूजीईसीएलसाठी बँकेचे लक्ष प्रामुख्याने टू टिअर,थ्री टीअर शहरांवर असले तरी, बँकेच्या संपूर्ण भारतातील शाखा ग्राहकांपर्यंत पोहोचण्यासाठी आणि त्यातील उणीवा कमी करण्यासाठी सक्रियपणे प्रयत्न करत आहेत. युनियन बँक ऑफ इंडिया सध्याच्या संकटकाळात सर्व एमएसएमई,बिझनेस युनिट्सना साथ देईल आणि त्यांना आवश्यक तो आधार देईल.

कोव्हिड १९ च्या उद्रेकामुळे देशातील व्यावसायिक संस्था आणि देशाच्या अर्थव्यवस्थेवर विपरित परिणाम झाला आहे. या कोरोनाच्या संकटकाळात विविध उद्योगांना , एमएसएमई घटकांना आधार देण्यासाठी भारत सरकार आत्मनिर्भर अभियानाद्वारे अनेक उपाययोजना राबवित आहे. यापैकीच एक उपक्रम म्हणजे, इमर्जन्सी क्रेडिट लाइन गॅरेंटी स्कीम ईसीएलजीएस (गॅरेंटीड इमर्जन्सी क्रेडिट लाइन- जीईसीएल या पत उत्पादनासह) . या योजनेत व्यापारातील २५ कोटी रुपयांपर्यंतच्या एकूण उर्वरीत कर्जाच्या २० टक्क्यांपर्यंतच्या अतिरिक्त कार्यरत भांडवली मुदत कर्जासाठी १०० टक्के गॅरेंटी कव्हरेज देते, म्हणजेच ५ कोटी रुपयांपर्यंत. २९.०२.२०२० पासून ही योजना प्रभावी असून या तारखेपासून ६० दिवसांपूर्वी किंवा त्यापेक्षा कमी कालावधीच्या खात्यासाठी ती लागू होते.

 567 total views,  1 views today

Leave a Reply

Your email address will not be published.