संतप्त नागरिकांचा महावितरण कार्यालयावर धडक मोर्चा

सतत वीजपुरवठा खंडीत होत असताना महावितरणच्या अधिकाऱ्यांकडून प्रतिसाद मिळाला नाही

डोंबिवली : गेले अनेक दिवस डोंबिवली एमआयडीसी भागात सतत वीज पुरवठा खंडीत होत असल्याने अखेर संतप्त नागरिकांनी महावितरणचा कार्यालयावर नागरिकांनी धडक मोर्चा काढला. यावेळी नागरिकांनी उपकार्यकारी अभियंता यांना याबाबत जाब विचारला. तीन जून सकाळी साडेदहा पासून वादळाचे कारण सांगून वीजपुरवठा बंद करण्यात आला होता. परंतु सायंकाळपर्यंत वीजपुरवठा सुरू न झाल्याने नागरिकांनी महावितरणचा अभियंताना फोन केले. मात्र नेहमीप्रमाणे त्यांच्याकडून काहीही प्रतिसाद मिळाला नाही. या प्रकारामुळे त्यामुळे नागरिक खूप चिडले होते. रात्री दहाचा दरम्यान काही ठिकाणी वीज पुरवठा पूर्ववत झाला नव्हता. तर काही ठिकाणी दुसऱ्या दिवशी गुरुवारी दुपारी एक वाजेपर्यंत वीज पुरवठा पूर्ववत झाला नाही. गेल्या अनेक दिवसांपासून निवासी परिसरात वीजपुरवठा बंद होण्याचे प्रमाण वाढले असून केबल फॉल्ट, ट्रान्सफॉर्मरला आगी लागणे, स्पार्क होणे, ट्रान्सफॉर्मर मधुन स्फोटासारखा आवाज येणे अशा अनेक कारणांमुळे वीज पुरवठा खंडीत होत आहे. महावितरणचा एमआयडीसी कार्यालयाचा आवारात अनेक वर्षांपासून दरवर्षी पाणी भरते. त्यामुळे वीज ग्राहकांना व कर्मचाऱ्यांना त्रास होत आहे. यावरही महावितरण काहीही करीत नाही. नागरिकांनी लॉकडाऊन असूनही त्रासपोटी महावितरण कार्यालयावर येऊन त्यांनी आपला राग व्यक्त केला. यावेळी धर्मराज शिंदे, नंदू परब, राजू नलावडे, करिष्मा प्रताप, उल्हास सावंत, रामदास मेंगडे, मोहन पुजारे, मनोहर पाटील, माटल, दुर्वाकुर जोशी इत्यादी नागरिकांबरोबर उपस्थित होते.

 558 total views,  1 views today

Leave a Reply

Your email address will not be published.