उत्पादन कपातीमुळे कच्च्या तेलाच्या किंमतीत वाढ

कच्च्या तेलाच्या किंमती ३.८७ टक्क्यांनी वाढून ३६.८ डॉलर प्रति बॅरलवर थांबल्या.

मुंबई : ओपेक आणि रशियाने कच्च्या तेलातील भरीव उत्पादन कपात पुढील काही महिने कायम ठेवण्याचे संकेत दिल्यानंतर मंगळवारी कच्च्या तेलाच्या किंमती ३.८७ टक्क्यांनी वाढून ३६.८ डॉलर प्रति बॅरलवर थांबल्या. रस्ते आणि हवाई वाहतूक सुरू झाली, अनेक ठिकाणचे कारखाने आणि उत्पादन सुरू झाल्याने कच्च्या तेलाच्या किंमती वाढल्याचे एंजल ब्रोकिंग लिमिटेडचे गैर कृषी वायदा व चलनचे मुख्य विश्लेषक प्रथमेश माल्या यांनी सांगितले. ते पुढे म्हणाले जगातील दोन मोठ्या अर्थव्यवस्थांमधील काही महत्त्वाचे व्यापारी करार रद्द करण्यावरून तणाव वाढत आहे. हा करार रद्द झाल्यास कच्च्या तेलाची मागणीही कमी होईल.

अनेक व्यवसायांमध्ये जोखीमीच्या मालमत्तेची मागणी वाढल्याने सोन्याच्या किंमती ०.७४% नी कमी होऊन त्या १७२७.० डॉलर प्रति औसांवर बंद झाल्या. अनेक देशांनी लॉकडाउनचे निर्बंध शिथिल केले तसेच वेगाने आर्थिक सुधारणेसाठी योजना आखल्यामुळे सोन्याच्या किंमतीमध्ये घसरण दिसून आली.

चांदीच्या किंमती ०.९९ टक्क्यांनी घसरून १८.१ डॉलर प्रति औसांवर आल्या. एमसीएक्सवर त्या ३ टक्क्यांनी घसरून ४९,०८० रुपये प्रति किलोवर थांबल्या.

चीनमधील औद्योगिक कामकाज सुरू झाल्यामुळे लंडन मेटल एक्सचेंजवरील बेस मेटलच्या किंमती सकारात्मक स्थितीत बंद झाल्या. तथापि, हेज फंड्स अजूनही औद्योगिक धातूंमध्ये मोठी झेप घेऊ शकलेले नाहीत. यामुळे बाजारपेठा सावध आहेत. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी साथीच्या आजारासाठी चीनला दोषी धरल्यामुळे अमेरिका-चीनमधील तणाव कायम आहे. काही वृत्तांनुसार, चीनने अमेरिकेतील शेती उत्पादनांमधील मोठी खरेदी थांबवली आहे. यातून व्यापार युद्धात भर घातली असून यामुळे बेस मेटलच्या किंमतीवरही मर्यादा आल्या आहेत.

 480 total views,  1 views today

Leave a Reply

Your email address will not be published.