‘हिंदवी स्वराज्य ते हिंदु राष्ट्र’ या विषयावर विशेष संवाद

शिवराज्याभिषेक दिनानिमित्त हिंदु जनजागृती समितीतर्फे ऑनलाईन कार्यक्रम

मुंबई : मोगलांच्या जुलमी वरवंट्याखाली पिचलेल्या हिंदु जनतेमध्ये मोगलांशी टक्कर घेण्याचे दुर्दम्य साहस निर्माण करणारे अन् हिंदवी स्वराज्याची मुहूर्तमेढ रोवणारे छत्रपती शिवाजी महाराज यांचा ४ जून रोजी शिवराज्याभिषेकदिन साजरा होत आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक म्हणजे इतिहासातील एक सोनेरी पान आहे. शिवछत्रपतींच्या पराक्रमाचे स्मरण करण्यासाठी आणि त्यातून जनतेमध्ये स्फूर्ती निर्माण होण्यासाठी हिंदु जनजागृती समितीच्या वतीने ‘शिवराज्याभिषेक दिना’निमित्त विशेष संवादाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमाचे ४ जून रोजी सायंकाळी ७ ते ८.३० या वेळेत फेसबूक आणि यू-ट्यूब या सामाजिक संकेतस्थळांवर थेट प्रसारण (लाईव्ह) असणार आहे.

‘हिंदवी स्वराज्य ते हिंदु राष्ट्र’ या विशेष संवादामध्ये ‘छत्रपती शिवाजी महाराज एक चक्रवर्ती सम्राट’ या विषयावर ‘इंडिया टुडे’चे वरिष्ठ उपसंपादक  उदय माहूरकर, ‘हिंदवी स्वराज्य’ या विषयावर हिंदुत्वनिष्ठ लेखक अन् व्याख्याते डॉ. सच्चिदानंद शेवडे, तर ‘छत्रपती शिवरायांच्या दृष्टीने हिंदु राष्ट्र’ या विषयावर हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय प्रवक्ते रमेश शिंदे हे ‘फेसबूक लाईव्ह’ आणि ‘यू-ट्यूब लाईव्ह’ या माध्यमांतून संबोधित करणार आहेत.  समस्त शिवप्रेमी आणि राष्ट्रप्रेमी जनतेने मोठ्या संख्येने कार्यक्रमाचा लाभ घ्यावा, असे हिंदु जनजागृती समितीच्या वतीने आवाहन करण्यात आले आहे.

या विशेष संवादाचे थेट प्रसारण पुढील लिंक्सवरून केले जाणार आहे.

*Facebook.com/HinduAdhiveshan*
*YouTube.com/HinduJagruti*

 493 total views,  1 views today

Leave a Reply

Your email address will not be published.