टीका करणारे झारीतले शुक्राचार्य-सचिन शिंदे

क्लबहाऊस क्वारंटाईन योजनेची काँग्रेसकडून पाठराखण

ठाणे : कोरोना ही जागतिक आणि राष्ट्रीय आपत्ती आहे. या आपत्तीत नागरिकांच्या हितासाठी ठामपा विविध योजना राबवत आहे.सोसायट्यांमधील सभागृह आणि क्लब हाऊस क्वारंटाइन सेंटर घोषित करणे हा निर्णयही याचाच भाग आहे,अशा प्रसंगी सहकार्याची न भूमिका न ठेवता संभ्रमाचे वातावरण निर्माण करून काहीजण झारीतल्या शुक्राचार्याप्रमाणे खोडा घालत असल्याचा आरोप इंटक कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष व शहर काँग्रेस प्रवक्ते सचिन शिंदे यांनी केला आहे.

कुठल्याही प्रकारचा इतिहास नसलेली कोरोना ही आपत्ती देशावर कोसळली आहे. अशावेळी काहीजण ठाणे महानगरपालिका करत असलेल्या उपाय-योजनांना सहकार्य करायचे सोडून इतिहास आणि नागरिक शास्त्राच्या गोष्टी शिकवत असल्याचा उपरोधिक टोला सचिन शिंदे यांनी लगावला आहे.

प्रत्येक सोसायटीचे क्लब हाऊस हे तेथील नागरिकांच्या वापरासाठी असते. अशा ठिकाणी सार्वजनिक उत्सव, वाढदिवस, बैठका होतात. क्लब हाऊसचा उपयोग तेथे राहणाऱ्या नागरिकांना होईल अशीच त्यामागची संकल्पना आहे. पावसाळ्यात साथीच्या रोगांचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात होतो. त्या अनुषंगाने कोरोनाची वाढती रुग्णसंख्या लक्षात घेऊन भविष्यातील उपाययोजना म्हणून ठाणे महानगरपालिका प्रशासन क्लब हाऊस क्वारंटाइन संकल्पना प्रत्यक्षात राबवण्याचा प्रयत्न करत आहे.प्रत्येक ताप हा कोरोनाचा नसतो,डेंग्यू, मलेरिया अथवा साधा तापही असू शकतो.साधा ताप असेल आणि क्लब हाऊसला व्यवस्था असल्यास कोरोना उपचारासाठी क्वारंटाइन सेंटरला जाण्याची गरज नाही,पण काही लोक या गोष्टीचे राजकारण करण्यात व्यस्त आहेत,नियमांच्या गोष्टी,खर्चाच्या गोष्टी करत आहेत.या उलट कशा पद्धतीने ही योजना योग्य रीतीने राबवू शकू याबाबत सूचना करून प्रशासकीय कामात सहकार्य केले पाहिजेत. नगरसेवकांनी आपापल्या प्रभागात ही योजना राबवण्यासाठी संपर्क साधला पाहिजे,प्रभावी अंमलबजावणीसाठी सहकार्य केले पाहिजे,असे मत शिंदे यांनी व्यक्त केले आहे.

एकीकडे वाढती रुग्णसंख्या लक्षात घेता प्रशासन मैदाने,शाळा,हॉटेल या ठिकाणी रुग्णांची व्यवस्था करत असताना सोसायटीतील नागरिकांनी अशा बिकट प्रसंगी स्वतःसाठीच क्लब हाऊसचा वापर केल्यास गैर काय? असा सवाल शिंदे यांनी शेवटी व्यक्त केला आहे.

 505 total views,  1 views today

Leave a Reply

Your email address will not be published.