महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे ठाणे- पालघर जिल्हा अध्यक्ष अविनाश जाधव यांनी आवाज उठविल्यानंतर दोनच दिवसात हे रुग्णालय सुरु झाले
ठाणे : देशात कोरोना विषाणुने थैमान घातले असतांना भारतातली सगळ्यात मोठी आरोग्य संस्था इंडियन रेडक्रॉस सोसायटीचे ठाण्यातील मध्यवर्ती ठिकाणी असलेले रुग्णालय बंद अवस्थेत होते. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे ठाणे- पालघर जिल्हा अध्यक्ष अविनाश जाधव यांनी आवाज उठविल्यानंतर दोनच दिवसात हे रुग्णालय सुरु झाले आहे.
तीन पेट्रोल पंप जवळ असलेले इंडियन रेडक्रॉस सोसायटीचे रुग्णालय बंद अवस्थेत असल्याची माहिती अविनाश जाधव यांना मिळाल्यानंतर त्यानी ३१ मे रोजी या रुग्णालयाला भेट दिली. रुग्णालय बंद अवस्थेत असल्याचे पाहून त्यांनी तत्काळ ठाणे मनपा आयुक्त विजय सिंघल यांना हे रुग्णालय ताब्यात घेण्याची सुचना केली तसेच रुग्णालय न उघडल्यास मनसे रुग्णालयाचे दरवाजे उघडून आपल्या डॉक्टरांची टीम बसवेल असा इशारा दिला होता. आज अखेर हे रुग्णालय सुरु झाले आहे. हे रुग्णालय उघडल्यामुळे सर्वसमान्य नागरिकांना अतिशय अल्पदरात विविध आजरांवर उपचार घेण्याची सुविधा मिळणार आहे.
498 total views, 1 views today