५० पोलिसांसह २०० जणांचा केला सन्मान
डोंबिवली: मैत्री कल्याणकारी संस्थेतर्फे कोरोना महामारी च्या प्रसंगी जनसेवा तसेच प्राणी सेवा गरजूंना मदत करणाऱ्या व आपल्या कुटुंब याची पर्वा न करता रस्त्यावर उतरून काम करणाऱ्या सेवाभावी नागरीकांचा कोरोना योद्धा या सन्मानाने पोलीस वर्ग , हॉस्पिटल वर्ग, डॉक्टर परिचारिका, पत्रकार, कलावंत ,पोस्टमन ,सफाई कामगार ,सेवाभावी संस्था व इच्छुक नागरिक या सर्वांना कोरोना योद्धा या सन्मानाने प्रत्यक्षरित्या भेटून तसेच ऑनलाईन सर्टिफिकेट द्वारे जवळजवळ २०० सर्टिफिकेट मैत्री कल्याणकारी संस्थेचे अध्यक्ष कविता देशपांडे आणि कायदेशीर सल्लागार तसेच सेक्रेटरी अॅॅड प्रदीप बावस्कर यांच्या वतीने देण्यात आले. ५० पोलीस कर्मचारी अधिकारी, तसेच ४० डॉक्टर परिचारिका व हॉस्पिटल स्टाफ तसेच १० पत्रकार, १० कलावंत २५ साफ सफाई कामगार २५ वाभावी नागरिक, पाच गॅस सिलेंडर कर्मचारी ,१० भाजीविक्रेते , ५ पोस्टमन व ४ नगरसेवक, १० वकील व १६ सेवाभावी समाजसेवक त्यांना सन्मानपत्र देण्यात आली.
617 total views, 1 views today