ठाणे महानगर पालिकेच्या आरोग्य विभागाचा ढिसाळ कारभार चव्हाट्यावर

अपुऱ्या शववाहिकेमुळे नातेवाईकांना करावी लागते प्रतिक्षा

मनपाच्या केवळ ४ शवाहिका अन् दहा कर्मचारी

ठाणे : करोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे मृतदेहांची वाहतूक खासगी रूग्णवाहिका करत नाहीत. त्यात करोनामुळे मृत्यू होण्याचे प्रमाण वाढल्याने शववाहिकेसाठी ठाण्यातील नागरिकांना महापालिकेच्या ४ शववाहिकेवर अवलंबून रहावे लागत आहे धक्कादायक प्रकार म्हणजे या शवाहिकांसाठी लागणारे कर्मचारी पण पालिकेकडे अपुरे असून या कसोटीच्या काळात जेथे १५ कर्मचाऱ्यांची गरज आहे तेथे फक्त १० कर्मचाऱ्यांच्या जीवावर काम होते आहे या करोनाच्या काळात अनेकवेळा शववाहिका वेळेत उपलब्ध होत नसल्याने नागरिकांना तासंतास प्रतिक्षा करावी लागत आहे. यासाठी महापालिकेने शववाहिका वाढवाव्यात अशी मागणी मनसेने निवेदनाद्वारे केली आहे.

सध्या करोना विषाणूच्या संसर्गाच्या भीतीने प्रशासनाने संचारबंदी लागू केली आहे. त्यामुळे मयत व्यक्तीची अंत्ययात्रा काढणे शक्य नाही. शिवाय अंत्यसंस्कारासाठी केवळ ५ ते दहा लोकांची उपस्थित राहण्याचे आदेश प्रशासनाने दिले आहे. गर्दी टाळण्यासाठी नागरिक अंत्ययात्रा काढण्याऐवजी शववाहिकेलाच बोलवले जाते. पण महापालिकेच्या हद्दीत केवळ चार शववाहिका अन् दहाच कर्मचारी असल्याने अनेकदा मयताच्या नातेवाईककांना शववाहिका उपलब्ध होईपर्यंत वाट पहावी लागत आहे. वाढती लोकसंख्या पाहता चार शववाहिका अपुऱ्या पडत आहेत. करोनाचा संसर्ग वाढल्याने आरोग्य यंत्रणांवर ताण पडला असून त्यामुळे अनेक ठिकाणी आरोग्य विभागाबाबतचा हलगर्जीपणा समोर येत आहे. ठाणे शहरात आतापर्यंत करोनामुळे ,७५ जणांचा मृत्यू झाला आहे. तर २ हजारहून अधिक करोनाबाधित आहेत. या भीषण परिस्थितीत महापालिकेकडे अपुरी रूग्णवाहिका आणि शववाहिका आहेत. चार शववाहिकेमधील २ शववाहिकामध्ये कोव्हिड तर दोन शववाहिकेत नॉन कोव्हिड मृतदेह नेले जात आहेत. दररोज सुमोर दहाहून अधिक मृतदेह स्मशान भूमीत नेण्यात येतात. त्यामुळे या करोनाच्या काळात महापालिकेने टीएमटी बसेस यांच्यात काही बदल करून त्यांना शववाहिका म्हणून उपयोग कऱण्याचा विचार करावा अशी मागणी मनसेचे स्वप्निल महिंद्रकर यांनी केली आहे.

 498 total views,  1 views today

Leave a Reply

Your email address will not be published.