भारतीय ऑलिम्पिक संघटनेच्या युवा कमिशन मध्ये महाराष्ट्राच्या नामदेव शिरगावकर यांची निवड

शिरगावकर आता घडवणार युवा खेळाडू

कल्याण : भारतीय ऑलिम्पिक असोसिएशनमध्ये सहसचिव तथा इंडिया तायक्वांदोचे अध्यक्ष असलेले महाराष्ट्राचे नामदेव शिरगावकर यांना आता महाराष्ट्रासह देशातील युवा खेळाडू घडवण्याची संधी मिळाली आहे. भारतीय ऑलिम्पिक असोसिएशनकडून (आयओए) युथ कमिशन या समितीतील चार जणांच्या नावांची घोषणा केली. यामध्ये महाराष्ट्रातील नामदेव शिरगावकर यांच्यासह दुष्यंत चौटाला, विराज दास, आणि चांदसिंग टोकस यांचा समावेश आहे.

नामदेव शिरगावकर हे इंडिया तायक्वांदोचे अध्यक्ष असून भारतीय ऑलिम्पिक असोसिएशनचे सहसचिव आहेत. भारतीय ऑलिम्पिक असोसिएशन मध्ये सर्वात युवा पदाधिकारी म्हणून त्यांची ओळख आहे. भारतीय ऑलम्पिक असोसिएशनचे अध्यक्ष नरेंद्र बात्रा यांनी नामदेव शिरगावकर यांच्यावर विश्वास दाखवताना पुन्हा एक नवीन जबाबदारी दिली आहे. या युथ कमिशनच्या अध्यक्षपदी हरियाणाचे उपमुख्यमंत्री तथा भारतीय टेबल टेनिस महासंघाचे अध्यक्ष दुष्यांत चौटाला यांचा अनुभव नामदेव शिरगावकर यांना उपयोगी पडणार आहे. भारत हा युवकांचा देश आहे. भविष्यातील ऑलिंपियन्स या युवकां मधून शोधून त्यांना मार्गदर्शन करण्याची संधी या युवा कमिशन च्या माध्यमातून भारतीय आॕलंम्पिक असोशिएशनचे अध्यक्ष नरेंद्र बात्रा यांच्या मार्गदर्शनाखाली मिळाली असून गुणवंत युवा आॕलंम्पियन्स शोधण्याचे, त्यांना न्याय मिळवून देण्याचे व क्रीडा क्षेत्रात विकासात्मक कार्य यशस्वीपणे आंम्ही पार पाडू ,असा विश्वास यावेळी नामदेव शिरगावकर यांनी व्यक्त केला आहे.
ही समिती युवा खेळाडूंमधील गुण हेरुन त्यांना मार्गदर्शन करण्याचे काम करणार आहे. ज्या खेळाडूंमध्ये गुणवत्ता आहे, अशा होतकरू खेळाडूंना शोधून ते या युवकांना दिशा देणार आहेत. भारतातील युवा क्रीडा शक्ती घडवण्याचे काम आयओएने या समितीवर सोपवले आहे. भारतीय आॕलंम्पिक असोशिएशनचे अध्यक्ष नरेंद्र बात्रा यांनी युथ कमिशनच्या अध्यक्षपदी हरियाणाचे उपमुख्यमंत्री तथा टेबल टेनिस फेडरेशन ऑफ इंडियाचे अध्यक्ष दुष्यंत चौटाला यांच्यासह बॅडमिंटन असोसिएशन ऑफ इंडिया चे उपाध्यक्ष विराज दास , इंडिया तायक्वांदो चे अध्यक्ष नामदेव शिरगावकर व चांदसिंग टोकस यांची चार सदस्यीय समिती मध्ये निवड करण्यात आली आहे.
निवड झाल्याबद्दल महाराष्ट्र तायक्वांदो कोअर कमिटीचे सदस्य आबासाहेब झोडगे, संदीप ओंबासे,
विनायक गायकवाड,
मिलींद पठारे, प्रविण बोरसे, सुभाष पाटील, डाॕ. अविनाश बारगजे, सुरेश चौधरी, गफार पठाण व धुलीचंद मेश्राम यांनी अभिनंदन केले आहे.

 400 total views,  1 views today

Leave a Reply

Your email address will not be published.