श्रमिक ट्रेन रद्द केल्याचा जाब विचारणार्‍या खासदारांनाच पोलिसांची अरेरावी

पत्रकारांनाही पोलिसांची दमदाटी
ठाणे : मजुरांना रेल्वे स्थानकात बोलवाल्यानंतर अचानक श्रमिक ट्रेन रद्द करणार्‍या प्रशासनाला जाब विचारणार्‍या खासदारांनाच पोलिसांनी अरेरावी करण्याचा प्रकार ठाणे रेल्वे स्थानकामध्ये घडला. विशेष म्हणजे, याचे वृत्तांकन करणार्‍या पत्रकारांनाही सदर महिला अधिकार्‍याने दमदाटी केली. या प्रकरणाचा ठाणे शहर दैनिक पत्रकार संघाचे अध्यक्ष राजेश मोरे आणि सरचिटणीस समीर मार्कंडे यांनी निषेध केला असून या अधिकार्‍यावर कारवाईची मागणी केळी आहे.
केरळ आणि वाराणसीला मंगळवारी रात्री श्रमिक ट्रेन सोडण्यात येणार होती. त्यासाठी ठाणे शहराच्या विविध भागात राहणार्‍या मजुरांना रेल्वे स्थानकामध्ये सायंकाळी सहा वाजताच बोलावण्यात आले होते. मात्र, रात्रीचे दहा वाजले तरी रेल्वे येत येत नसल्याने चौकशी करण्यासाठी खा. राजन विचारे हे रेल्वे स्थानकात आले. त्यांनी रेल्वे अधिकार्‍यांशी संपर्क साधून गाडीची व्यवस्था केली. मात्र, आलेल्या गाडीमध्ये प्रचंड घाण असल्याने एका प्रवाशाने त्याचे शुटींग करण्याचा प्रयत्न केला. तसेच, याबाबत तहसीलदार, जिल्हाधिकारी कार्यालयातील अधिकारी व खासदार राजन विचारे यांनी याबाबत विचारणा केली असता , येथे उपस्थित असलेल्या एका महिला पोलीस अधिकार्‍याने खासदारांशीच उद्धट पद्धतीने भाष्य करण्यास सुरुवात केली. खा. विचारे यांच्या प्रयत्नांमुळे केरळला जाणारी गाडी आली असली तरी सुमारे ४ ते पाच तास प्रवाशी ताटकळत असतानाही वाराणसीला जाणारी गाडीही अचानक रद्द करण्यात आली. याबाबत पुन्हा विचारणा केली असता सदर महिला पोलीस अधिकार्‍याने पुन्हा अरेरावी करण्यास सुरुवात केली.
दरम्यान, या ठिकाणी वृत्तांकन करणार्‍या पत्रकारांचे कॅमेरे ओढण्याचा प्रयत्न केला. पत्रकारांना दंडुक्याचा वापर करीत चक्क रेल्वे स्थानकाबाहेर पिटाळून लावले. या प्रकाराचा ठाणे शहर दैनिक पत्रकार संघाचे अध्यक्ष राजेश मोरे आणि सरचिटणीस समीर मार्कंडे यांनी निषेध केला असून या पोलीस अधिकार्‍यावर कारवाई करावी, अशी मागणी करणारे पत्र ठाणे पोलिस आयुक्त व सेंट्रल रेल्वे अधिकारी यांना देण्यात आले आहे.

 511 total views,  1 views today

Leave a Reply

Your email address will not be published.