महाराष्ट्र राज्य खो खो संघटनेचा उपक्रम
मुंबई : महाराष्ट्र राज्य खो-खो असोसिएशनच्या वतीने २६ मे रोजी ऑनलाइन खो-खो खेळाडूंसाठी ऑनलाइन पौष्टिक आहार मार्गदर्शन कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे.
देशात सर्वत्र कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव व प्रतिबंधात्मक उपाययोजनांसाठी लॉकडाऊनची स्थिती आहे . अशा परिस्थितीत खेळाडू, प्रशिक्षक ,मार्गदर्शक यांचे ज्ञान अद्ययावत करण्यासाठी राज्य खो-खो संघटना व शिवाजी महाविद्यालयाने ५ ते १३ मे दरम्यान ऑनलाइन खो-खो प्रशिक्षण व मार्गदर्शन कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते.
आता मंगळवार २६ मे रोजी सकाळी ११:०० वाजता खो-खो खेळाडूंसाठी ऑनलाइन पौष्टिक आहार मार्गदर्शन कार्यशाळा आयोजित केली आहे. हे वेबिनार सुरवातीला मराठी व त्यानंतर लगेच इंग्लिश मध्ये होणार असून अपूर्वा कुंभकोनी (पौष्टिक आहारतज्ञ) मार्गदर्शन करणार आहेत.
ही कार्यशाळा आयोजित करण्यासाठी राज्य खो खो संघटनेचे अध्यक्ष संजीवराजे निंबाळकर, खो-खो फेडरेशनचे सहसचिव डॉ. चंद्रजीत जाधव, राज्य संघटनेचे कार्याध्यक्ष सचिन गोडबोले, सचिव गोविंद शर्मा (9422294176), खजिनदार अॅड. अरुण देशमुख यांनी पुढाकार घेतला आहे. अधिक महितीसाठी राज्य संघटनेचे सचिव गोविंद शर्मा यांच्याशी संपर्क साधावा.
601 total views, 1 views today