लोकमान्यनगर, सावरकनगर हाजुरीत संसर्ग वाढू देऊ नका

परिसर भेटीत महापालिका आयुक्तांनी दिल्या पालिकेच्या अधिकाऱ्यांना सूचना

ठाणे : लोकमान्यनगर, सावरकनगर या ठिकाणी कोरोना बाधित रुग्णांच्यासंख्येत वाढ होत असल्याच्या पार्श्वभूमीवर आज महापालिका आयुक्त विजय सिंघल यांनीसंपूर्ण परिसराची पाहणी करून या परिसरात संसर्ग वाढू नये यासाठी ठोस उपाययोजनाकरण्याच्या सूचना त्यांनी सर्व अधिकाऱ्याना केल्या.
यावेळी अतिरिक्त आयुक्त(२) संजय हेरवाडे, परिमंडळ(३) उप आयुक्त अशोक बुरपल्ले, परिमंडळ उप आयुक्त, संदीप माळवी, सहाय्यक आयुक्त नयन ससाणे, विजयकुमार जाधव, प्रणाली घोंगे आदी उपस्थित होते.
लोकमान्य नगर सावरकर नगर परिसरात कोरोनाकोव्हीड १९ चा वाढता संसर्ग लक्षात नागरिकांना काहीलक्षणे आढळल्यास शासनाचे निर्देशान्वये संबंधितांस अलगीकरण अथवा टेस्टिंगसाठीपाठविणे, पॉझिटीव्ह रुग्ण आढळल्यास शासननिर्देशान्वये क्लोज कॉन्टॅक्ट व्यक्ती शोधणे, ५०० प्रतिबंधित क्षेत्रातील सर्व रहिवाशांचेसर्व्ह करणे, केंद्र शासनाच्या निर्देशानुसार संशयितव्यक्तीना शोधणे त्यांचा पाठपुरावा करणे, हायरिस्कव्यक्तींची चाचणी करणे, कोविड-१९ च्या विविध प्रतिबंधात्मक उपाययोजनांपैकी दुकाने , सोशल डिस्टन्स, जीवनावश्यक वस्तु पुरवठा आदी बाबत महापालिकाआयुक्त सिंघल यांनी सविस्तर चर्चा करून उपाययोजनाची प्रभावी अंमलबजावणीकरण्याच्या कडक सूचना दिल्या.
यावेळी सिंघल यांनी वर्तकनगर प्रभागसमितीतंर्गत विजयनगर, लोकमान्यनगर पाडाक्र.१,२,३ आणि ४, कोरस हाॅस्पीटल, काजुवाडी, साईनाथनगर, काजुवाडी हाॅस्पीटल या ठिकाणीभेट दिली. त्यानंतर त्यांनी हाजुरी येथे नव्याने सुरूकरण्यात येणाऱ्या अलगीकरण कक्षाची पाहणी करून येथील सुविधांचादेखील आढावा घेतला.अलगीकरण कक्षात दाखल होणाऱ्या व्यक्तींना सर्वोतोपरी सेवासुविधा देण्याच्या सूचनात्यांनी दिल्या. यावेळी परिमंडळ(२) चे उप आयुक्त संदीप माळवी, वागळे प्रभाग समिती सहाय्यक आयुक्त विजयकुमारजाधव, नौपाडा-कोपरी प्रभाग समिती सहाय्यक आयुक्तप्रणाली घोंगे, कार्यकारी अभियंता धुमाळ, चेतन पटेल आदी उपस्थित होते.

 396 total views,  1 views today

Leave a Reply

Your email address will not be published.