थायरोकेअर लॅबला ठाण्यात कोव्हीड १९ ची स्वॅब तपासणी करण्यास बंदी

अहवाल चुकीचे दिल्याचे झाले स्पष्ट

असमाधानकारक कोविड चाचणी सुविधेबद्दल महापालिकेचा निर्णय

ठाणे : थायोरोकेअर लॅब या आयसीएमआरच्या अधिकृतप्रयोगशाळेत कोव्हीड १९ च्या स्वॅबतपासणीत ६ प्रकरणात चुकीचा अहवाल आढळल्याने या लॅबलाठाण्यात कोव्हीड १९ चे स्वॅबतपासणी करण्यास बंदी घालण्याचा आदेश महापालिका आयुक्त विजय सिंघल यांनी दिला आहे.
ठाणे शहरात कोरोना कोव्हीड – १९ची प्राथमिकलक्षणे आढळणाऱ्या संशयित रुग्णांची कोव्हीड – १९ची तपासणी शासनमान्यप्रयोगशाळेकडेच करण्यात येते. थायोरोकेअर लॅब आयसीएमआरच्या अधिकृत प्रयोगशाळेच्यायादीमध्ये घोषित करण्यात आली होती. परंतु ठाणे महानगरपालिका क्षेत्रात सदरप्रयोगशाळेने दिलेल्या ६ प्रकरणांमध्ये चुकीचा अहवाल असल्याचे आढळून आले. यामुळे अनेक रूग्णांना सामाजिक आणि मानसिकत्रासातून जावे लागले होते.
त्यामुळे २२ मे २०२० पासून ठाणे महानगरपालिकाक्षेत्रातील संशयितांसाठी कोविड -१९ स्वॅबगोळा करू नये असे आदेश ठाणे महापालिका आयुक्त विजय सिंघल यांनी दिले आहेत. कोविडचाचणी बाबत असमाधानकारक सुविधा दिल्यामुळे महापालिकेच्यावतीने हा निर्णय घेण्यातआला आहे.

 391 total views,  1 views today

Leave a Reply

Your email address will not be published.