गावावरून कामासाठी परतलेल्या कुटुंबाची नवी मुंबईत झाली दैना

७ तास उन्हात ठेवले तिष्ठत, माणुसकीला काळीमा लावणारी घटना


नवी मुंबई : मजूर गावी जाऊ नये मुंबईत रहावा यासाठी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री प्रयत्न करत असताना नवी मुंबईत मात्र सात तास बायको आणि मुलांसह उन्हात ताटकळत ठेवण्यात आले . कर्जुलेहर्या ता पारनेर जिल्हा अहमदनगर येथून आज सकाळी बाळू गोपाजी आंधळे हे आपल्या ओला गाडीतून नवी मुंबईत परतले. येताना मेडिकल सर्टिफिकेट शासनाचा नवी मुंबईत येण्याचा रीतसर पास त्यांनी काढला होता. त्यांची पत्नी व दोन अपत्यासोबत ते सकाळी जेव्हा जुईनगर सेक्टर २३ मधील श्री कानोबा छाया या सोसायटी मध्ये आले तेव्हा त्यांना प्रवेश नाकरण्यात आला. त्यांची हेंडसाळ करण्यात आली. तुम्ही मनाला वाटेल तेव्हा पळून जाता येथे यायचे नाही असे त्यांना सांगण्यात आले . त्यांनी त्यांच्या घरमालकांना बोलावले असता घरमालक स्वत: डॉक्टर आहेत त्यांनीही समजून सांगितले परंतु त्यांचे ऐकले नाही घरमालकांनी वैद्यकीय अधिकारी पुष्पा जवादे यांना संपर्क केला असता त्यांनी हि सोसायटी अध्यक्ष सचिव यांना समजावून सांगितले त्या कुटुंबाला १४ दिवस घरी राहण्याचे सुचविले तरी सोसायटीने त्यांचेही ऐकले नाही . त्यानंतर हे कुटुंब आपली फिर्याद घेवून नेरूळ वाड‍ अधिकारी तायडे यांच्या कडे गेले असता सोसायटीने त्यांचेही म्हणणे ऐकले नाही . अखेरीस हे कुटुंब पोलीस स्टेशन ला गेले त्यानंतर पोलीसांनी मध्यस्थी केली असता त्यांना शिरवणे आरोग्य केंद्रात मेडिकल सर्टिफिकेट घेण्यास सांगण्यात आले . सरते शेवटी हे कुटुंब मेडिकल सर्टिफिकेट घेऊन आल्यानंतर सोसायटीने यांच्या हातावर शिक्का नसल्याचे कारण पुढे करत प्रवेश पुन्हा नाकरला. पुन्हा या कुटुंबास पोलीस स्टेशन गाठावे लागले त्यानंतर या कुटुंबास प्रवेश मिळाला सकाळी ९ वाजल्यापासून संध्याकाळी ४ वाजेपर्यंत ओला चालवणाऱ्या या गरीब नागरिकाचे हाल सुरु होते ना या सात तासात ना कुणी त्यांना आधार दिला ना कुणी यांना पाणी विचारले . शेवटी स्थानिक मनसे विभाग अध्यक्ष अक्षय भोसले शाखा अध्यक्ष मयूर कारंडे यांनी त्यांना धावपळ करण्यास मदत केली .
इतक्या दिवस गुण्यागोविंदाने राहणारे लोक आज या कुटुंबाचे हाल गच्चीतून खिडकीतून पाहत होते परंतु कोणालाही त्यांना पाणी द्यावा असे वाटले नाही खरोखरच नवी मुंबईकरांनी माणुसकी इतकी सोडली का ? भारताच्या कोणत्याही कोपऱ्यातून येणाऱ्या प्रत्येक माणसाला आसरा देणारी आपली मुंबई त्यात इतकी निष्ठुर लोक होऊ शकतात का ? आज नवी मुंबईतील एका कुटुंबाला सरकारी सोपस्कार पूर्ण करूनही त्रासाला सामोरे जावे लागत असेल तर भविष्य काळात अश्या घटना होऊ नये. इतकीच माफक अपेक्षा …

 453 total views,  1 views today

Leave a Reply

Your email address will not be published.