एकतर गाडीची व्यवस्था करा नाहीतर घराजवळ नियुक्ती द्या

पोलिसांबरोबर काम करण्यासाठी संघटनेचे प्रशासनाला पत्र

मुंबई : कोरोना विषाणूच्या पार्शवभूमीवर मुंबईतून परप्रांतीय कामगार मोठ्या प्रमाणावर त्यांच्या मुळ गावी जात आहेत. या कामगारांना त्यांच्या गावी पाठविण्यासाठी पोलिस दलास मदत करण्यासाठी मंत्रालयातील १४५७ कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली. मात्र मंत्रालयातील अनेक कर्मचारी हे उपनगरात रहात असल्याने त्यांच्या येण्यासाठी सध्या सार्वजनिक वाहतूक व्यवस्था नाही. त्यामुळे त्यांच्या येण्यासाठी एक तर गाडीची व्यवस्था करा अथवा त्यांच्या घराजवळील पोलिस स्थानकात ड्युटी लावा अशी मागणी मंत्रालय कर्मचारी संघटनेने प्रशासनाकडे एका निवेदनामार्फत केली.
मंत्रालयात काम करणारे कर्मचारी हे ठाणे, रायगड, नवी मुंबई, वसई विरार, अंबरनाथ, बदलापूर, व पालघर या भागात रहात आहेत. त्यामुळे या परिसरातून शहरातील ड्युटीच्या ठिकाणी येण्यासाठी अडचणीचे ठरत आहे. लोकल रेल्वे, बेस्ट अथवा इतर महानगर पालिकांच्या बससेवा बंद आहेत. त्यामुळे या कर्मचाऱ्यांना पोलिसांसोबत काम करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर कसरत करावी लागत आहे. यापार्श्वभूमीवर बेस्टच्या बसेस या भागातून सुरु कराव्यात अथवा एखादी गाडी करावी अथवा या कर्मचारी रहात असलेल्या भागात त्यांची नियुक्ती करण्यात यावी. जेणेकरून त्याच्या जेवणाची व्यवस्थाही होईल आणि पोलिस दलाच्या कामातही मदत

 560 total views,  2 views today

Leave a Reply

Your email address will not be published.