१८ जून पर्यंत राज्यात पोहोचणार
मुंबई : राज्यात मे महिना संपण्यासाठी अवघे १० दिवस शिल्लक राहीलेले आहेत. लॉकडाऊन असला तरी आणि सततच्या तापमान वाढीमुळे नागरिकांना धड घरातही बसता येईना आणि बाहेरही जाता येईना. मात्र आता नागरिकांना दिलासादायक वृत्त असून यंदा मान्सूनचे ११ जूनला मुंबईत आगमन होणार असल्याचा अंदाज वर्तविण्यात आला असून त्यादृष्टीने पिकांचे नियोजन करावे असे आवाहन राज्य सरकारने शेतकऱ्यांना केले आहे.
११ जूनला जरी पावसाने मुंबईत आगमन झाले तरी तो संपूर्ण राज्यात १८ जून पर्यंत पोहोचणार आहे. तसेच २०२० चा नैऋत्य मौसमी पाउस सरासरी ९६ टक्के ते १०४ टक्के राहिल असा अंदाज असून अल-निनो सामान्य राहणार आहे. ऑगस्ट सप्टेंबर मध्ये सौम्य स्वरूपात एल निनो स्थिती राहिल असा अंदाज हवामान खात्याने राज्य सरकारला सादर केलेल्या आपल्या अहवालात नमूद केले.
562 total views, 3 views today