निफ्टी आणि सेन्सेक्समधील तेजी कायम

निफ्टी फार्माच्या ४ टक्के वृद्धीसह सेक्टरल निर्देशांकातही वृद्धी

मुंबई : भारतीय शेअर बाजार वृद्धीचा ट्रेंड कायम राखून सकारात्मक स्थितीत बंद झाला. निफ्टीने २.११ टक्के किंवा १८७.४५ अंकांची वृद्धी करत ९ हजाराचा टप्पा पार केला. तो अखेर ९,०६६.५५ अंकांवर बंद झाला. सेन्सेक्सदेखील २.०६% किंवा ६२२.४४ अंकांनी वाढून ३०,८१८.६१ अंकांवर बंद झाला. निफ्टी फार्माच्या ४ टक्के वृद्धीसह सेक्टरल निर्देशांकातही वृद्धी दिसून आल्याचे एंजल ब्रोकिंग लिमिटेडचे प्रमुख सल्लागार अमर देव सिंह यांनी सांगितले.

बाजारातील गेनर्स व लूझर्स

१२७७ शेअर्सनी वाढ दर्शवली तर १०४४ शेअर्सनी किंमत गमावली. तसेच १६९ शेअर्स त्यांच्या किंमतीवर स्थिर राहिले. डॉ. रेड्डीज लॅब (५.८२%), एचडीएफसी (६.१५%), एम अँड एम (५.७१%), बीपीसीएल (५.६९ %) आणि श्री सिमेंट (६.२४%) हे निफ्टीतील टॉप गेनर्सपैकी होते. निफ्टी फार्मा सेक्टर ४ टक्क्यांनी वाढले. त्यानंतर ऑटो, एनर्जी आणि बँकिंग क्षेत्राने नंबर लावला. बीएसई मिडकॅप आणि बीएसई स्मॉलकॅप निर्देशांक दिवसाअखेरपर्यंत प्रत्येकी १ टक्क्यांनी वाढले.

तर दुसरीकडे टॉप निफ्टी लूझर्समध्ये इंडसइंड बँक (२.६०%), भारती इन्फ्राटेल (६.९९%), हिरो मोटोकॉर्प (२.३४%), भारती एअरटेल (०.६५%) आणि वेदान्ता (१.६१%) यांचा समावेश झाला. रिलायन्स इंडस्ट्रीजी त्यांच्या सबस्क्रिप्शनसाठीचा हक्कांचा मुद्दा सुरु केला, त्यामुळे त्यांचा शेअर जवळपास २ % नी वाढला. कंपनीने हक्कांच्या मुद्द्यांमुळे ५३,१२५ कोटींची वाढ होईल, असा प्रस्ताव ठेवला आहे. ३ जून २०२० रोजी हे सबस्क्रिप्शन पूर्ण होईल.

बजाज फायनान्सने मार्च २०२० रोजी संपलेल्या तिमाहीनंतर कर भरल्यानंतर ९४८ कोटी रुपयांचा नफा घोषित केला. हा नफा १९.४% नी घटला असला तरी शेअरची किंमत जवळपास ४ टक्क्यांनी वाढली. एल अँड टी इन्फोटेकनेही मार्च २०२० रोजी संपलेल्या तिमाहीत ४२७ कोटी रुपयांचा प्रत्यक्ष नफा दर्शवल्यामुळे शेअरची किंमतदेखील ६ टक्क्यांनी वाढली. मागील वर्षीच्या कंपनीने नोंदवलेल्या नफ्यापेक्षा यावर्षीचा नफा १२.९ टक्क्यांनी जास्त नोंदला गेला.

लसीच्या चाचण्यांमुळे बाजारात तात्पुरता उत्साह

कोव्हिड-१९ लसीसाठीच्या चाचण्यांमुळे आजही गुंतवणूकदारांच्या भावना उत्साही राहिल्या. तथापि, अमेरिका-चीनमधील कोव्हिड-१९ च्या उद्रेकावरून सुरू असलेल्या वादाचे दुष्परिणाम आजही बाजारातील सकारात्मकतेवर झालेले दिसून आले. देशातील पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या वाढत असली तरी आज बाजारातील निर्देशांनी तसेच प्रमुख सेक्टरल निर्देशांकांनी दिवसभरात सकारात्मक व्यापार केला.

 439 total views,  2 views today

Leave a Reply

Your email address will not be published.