ठाण्यात कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी झोपडपट्यांमध्ये मोबाईल टॉयलेट किंवा इ टॉयलेटची व्यवस्था करा


राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे उपाध्यक्ष संतोष साटम यांनी पत्र पाठवून मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांच्याकडे मागणी केली आहे

ठाणे : ठाणे महापालिका हद्दीतील ठाणे शहरांमध्ये बरेच ठिकाणी मोठे स्लम आहेत. परंतू तेथे काॅमन शौचालये कमी प्रमाणात असल्यामुळे नागरीकांना शैचालयात जाण्याची गैरसोय मोठ्या प्रमाणात होत आहे. नागरीकांना लाईन लावावी लागत आहे. सोशल डीस्टंनसीग पाळता येत नाही. तसेच शौचालयांच्या कड्यांना व दरवाजांना प्रत्येकाचे वारंवार हात लागतात त्यामुळे नागरीकांना कोरोनाची लागण मोठ्या प्रमाणात होत आहे. ठामपा आपल्या परीने स्वच्छता करत आहे परंतू शौचालये कमी पडत आहेत. त्यामुळे ठाणे शहरातील सर्व स्लम भागामध्ये तातडीने मोबाई टाॅयलेट किंवा ई-टाॅयलेटची सूवीधा तातडीने उपलब्ध करून देण्याची मागणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे, ठाणे जिल्हाधिकारी राजेंद्र नार्वेकर, महापौर नरेश म्हस्के, विरोधी पक्षनेत्या प्रमिला केणी, ठामपा आयुक्त विजय सिघल यांच्याकडे पत्रद्वारे राष्ट्रवादी युवक उपाध्यक्ष संतोष साटम यांनी केली आहे.

 555 total views,  1 views today

Leave a Reply

Your email address will not be published.