ठाणे राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या गस्ती पथकाने अंबरनाथ तालुक्यातील माणेरे गावातुन उल्हासनगर चार नंबर येथे विक्रीसाठी आणलेली हातभट्टीची दारू घेतली ताब्यात
ठाणे: राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या ठाणे गस्ती पथकाने गावठी दारूचा साठा जप्त केला आहे . अंबरनाथ तालुक्यातील माणेरे गावातुन आणलेली हातभट्टीची दारू रिक्षातुन उल्हासनगर चार नंबर येथे विक्रीसाठी आणली जात असताना गस्ती पथकाने संशयास्पद हालचाली करणाऱ्या रिक्षा चालकाची तपासणी केली. या तपासणीमध्ये आरोपी रिक्षाचालकाने जुने कपडे विकायला नेत असल्याचे भासविले मात्र कपड्यांच्या आत मध्ये टायर ट्यूब मध्ये हातभट्टीच्या दारूचा साठा लपवल्याचे अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आले. दरम्यान सदर रिक्षा आणि मुद्देमाल ताब्यात घेत असताना आरोपीने तिथून पळ काढला आहे. मात्र आरोपीला लवकरच अटक करण्यात येईल असं राज्य उत्पादन शुल्क अधिकाऱ्यांनी या वेळी सांगितले.
692 total views, 1 views today