डोंबिवलीत शिवसेनेच्या वतीने गरजुना जीवनाश्यक वस्तूंचे वाटप

करोनासंबधीचे सोशल डिस्टसिंगचे निर्बध पाळण्यात आले होते. सुमारे पाच हजार नागरिकांनी याचा फायदा घेतला.

डोंबिवली : करोनातील संचारबंदी मुळे सामान्य नागरिक अन्न धान्यापासून वंचित झाला आहे अश्या गरजुना शिवसेऩच्या विविध शाखातून अन्नधान्य वाटप करण्यात येत आहे. डोंबिवलीतील कान्होजी जेधे शाखा, नवापाडा, आणि शिवसेनेच्या गणेश नगर येथील नगरसेविका रेखा जनार्दन म्हात्रे यांच्या वतीने नागरिकांना अन्नधान्य आणि जीवनाश्यक
वस्तूंचे वाटप करण्यात आले. यावेळी करोनासंबधीचे सोशल डिस्टसिंगचे निर्बध पाळण्यात आले होते. सुमारे पाच हजार नागरिकांनी याचा लाभ घेतला.
कल्याण डोंबिवली महापालिकेच्या स्थायी समितीचे माजी सभापती जनार्दन म्हात्रे, नगरसेविका रेखा म्हात्रे, माजी नगरसेविका गुलाब श्रीधर म्हात्रे, शिवसेना डोंबिवली विधानसभा अधिकारी राहुल श्रीधर म्हात्रे, उपशहर स़घटक सोपान पाटील, शाखाप्रमुख चंद्रकांत महाजन उपविभाग प्रमुख नरेश कदम, महिला उपवशहर संघटक केतकी पवार, अस्मिता खानविलकर, विभाग स़ंघटक उषा आचरेकर, युवती सेना पदाधिकारी जाई ढोले, शीतल कारंडे, शिवसैनिक, कार्यकर्ते आणि नागरिक अन्नधान्य वाटप समयी उपस्थित होते. याप्रसंगी राहुल म्हात्रे म्हणाले, राज्याचे मुख्यमंत्री म्हणून उध्दव ठाकरे सोमवारी शपथ घेत असून त्यांच्या मुळे कार्य करण्याची मोठी प्रेरणा आम्हा शिवसैनिकांना मिळत आहे.पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व शिवसैनिक करोना विरोधी लढ्यात काम करित आहेत.संचारबंदी मुळे गरिब सामन्य नागरिकांचे हाल होउ नये यासाठी संचारबंदिच्या पहिल्या टप्प्यापासून आम्ही नागरिकांना अन्नधान्य , जीवनाश्यक वस्तूंचे वाटप करुन प्रभागातील स्वच्छते कडे देखील लक्ष दिले.या संचारबंदिच्या चौथ्या टप्यात सुमारे पाच हजार नागरिकांना अन्नधान्य वाटप करण्यात आले.डाळ, तांदूळ, गहू, कांदा, तेल, कडधान्य, बटाटा यांचे वाटप करण्यात आले.गणेश नगर आणि कान्होजी जेधे या दोन्ही शिवसेना शाखा नागरिकांच्या अडीअडचणी सोडवण्यासाठी तत्पर असल्याचे राहुल म्हात्रे यांनी सांगितले.

 384 total views,  1 views today

Leave a Reply

Your email address will not be published.