सारथीचे अमोल धर्मे यांना कन्याशोक


अभाविपची कार्यकर्ती गायत्री धर्मेचे अवघ्या एकोणिसाव्या वर्षी निधन हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने गायत्रीवर काळाचा घाला

ठाणे : सारथीच्या अमोल धर्मे यांची मुलगी आणि अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या कोकण प्रांताची विद्यार्थिनी सहप्रमुख गायत्री धर्मे हीचे वयाच्या अवघ्या एकोणीसाव्या वर्षी हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने रात्री एकच्या सुमारास निधन झाले. हृदय विकाराचा झटका इतका जबरदस्त होता की, अवघ्या काही मिनिटांत गायत्रीला काळाने ओढून नेले. गायत्रीवर जवाहर बाग स्मशान भूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. गायत्री ठाणे महाविद्यालयात बीएमएमच्या दुसऱ्या वर्षाला शिकत होती. इयत्ता अकरावी पासून अखिल भारतीय विदयार्थी परिषद या विद्यार्थी संघटनेच्या कामात गायत्री सक्रिय होती. अभाविप ठाणे महानगर मंत्रीसह विविध जबाबदाऱ्या घेत अतिशय उत्साहाने, धडाडीने परिषदेचे काम करत होती. डिसेंबर २०१९ मध्ये झालेल्या अभाविपच्या प्रांत अधिवेशनात गायत्रीने विशेष योगदान दिले होते. गायत्री धर्मे हिची काम करण्याची क्षमता लक्षात घेऊन याच अधिवेशनात तिची प्रांत कार्यकारिणी सदस्य म्हणून निवड करून तिच्याकडे अभाविपच्या कोकण प्रांत विद्यार्थिनीं सहप्रमुख म्हणून काम देण्यात आले होते. गायत्रीचे वडील अमोल धर्मे ठाणे जिह्यातील सारथी या नामांकित जाहिरात एजन्सीचे मालक आहेत. गायत्रीची आई मानसी धर्मे चेंबूर येथील शाळेत वरिष्ठ शिक्षिका आहेत. गायत्रीचा भाऊ सोहम धर्मे इयत्ता बारावीत आहे. गायत्रीच्या अकाली जाण्याने धर्मे कुटुंबीयांवर दुःखाचा पहाड कोसळला आहे. अभाविपच्या सर्व कार्यकर्त्यांवर शोककळा पसरली आहे.

 371 total views,  1 views today

Leave a Reply

Your email address will not be published.