ठाण्यातील शहरी भागात माकडांचा मुक्त संचार


लॉक डाउनमुळे सिमेंटच्या जंगलात जंगल प्राण्यांचा मुक्त वावर
ठाणे  : गाड्यांचा आवाज नाही, माणसांची वर्दळ नाही, प्रदुषणाचा विळखा नाही सगळे कसे जंगलात असलेल्या शांतते सारखे. लॉक डाऊनमुळे शहरातही अशीच काहीशी परिस्थिती झालीये यामुळे मग आता जंगली प्राणी का बरे मुक्त वावर करणार नाहीत. ठाण्यात असाच काहीसा प्रकार घडलाय बोरिवली नॅशनल पार्क ठाणे शहरा लगतच असल्याने या जंगलातील माकडांनी गुरुवारी चक्क संपुर्ण ठाण्याची सफर केली आणि बघता बघता ठाणो पश्चिमेला स्टेशन जवळील घंटाळी रोडवर ही माकडे पोहोचली. या झाडावरु न त्या झाडावर माकडांचा खेळ सुरु  होता हे ठाणेकर पाहून सुखावले आणि त्यांनी त्यांच्या मोबाईल मध्ये हा क्षण कैद केले.
मागील २१ मार्च पासून संपूर्ण देशात कोरोनामुळे लॉकडाऊन झाले आहे. त्यामुळे रस्त्यांवर वाहनांसोबत, नागरीकांची वर्दळही कमी झाली आहे. वाहनांचे आवाजही बंद झाले आहेत. तसेच जंगल सफारींवरही त्याचा परिणाम झाला आहे, या ठिकाणी देखील नागरीक फिरकत नसल्याने येथील वन्यप्राणी प्राणी संग्रहालयात मुक्त संचार करतांना दिसत आहेत. परंतु आता येऊर, आणि त्याच्या बाजूलाच लागून असलेल्या संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाचा परिसरातून अनेक प्राणी आता रस्त्यांवर मोकळे फीरु लागले आहे. काही दिवसांपूर्वी येऊरच्या रस्त्यांवर घोडबंदर भागातील काही भागात बिबटय़ांचा मुक्त संचार दिसून आला होता. त्यानंतर चक्क नौपाडा, ठाणे स्टेशनच्या भागात माकडांचा मुक्त संचार सुरु असल्याचे दिसून आले आहे. गुरुवारी शहरातील घंटाळी भागात अशाच प्रकारे माकडांनी झाडांवरुन तर काही वेळेस रस्त्यावरुन मुक्त संचार केल्याचे दिसून आले. त्यामुळे हा मुक्त संचार अनेक नागरीकांना आपल्या मोबाइलच्या कॅमे:यामध्ये कैद केला.

 577 total views,  2 views today

Leave a Reply

Your email address will not be published.