वायूगळती रोखण्यााठी मुंबईची केमिकल कंपनी धावली आंध्रच्या मदतीला

एल. जी. पॉलिमरच्या स्टिरीन वायू गळती होत असलेल्या १८ टन मूळ रसायन असलेल्या टाकीमध्ये वैज्ञानिक पध्दतीने डोर्फ केटलचे केमिकल घटक टाकण्यात आले. यामुळे विषारी वायू गळती तर थांबलीच त्याच बरोबर भविष्यात पुन्हा अशी गळती होणार नाही याची व्यवस्थाही करण्यात आली.

मुंबई : आंध्रपदेशच्या विशाखापट्टनम येथील गतआठवडयातील वायू गळती दुर्घटनाप्रसंगी मुंबईची डोर्फ केटल कंपनी वेळीच धावून गेल्याने गंभिर स्वरूप प्राप्त झाले नाही.
विशाखापट्टनममधील विझाग परिसरातील एल. जी. पॉलिमर या कोरीयन रासायनिक कंपनीमध्ये ७ मे रोजी मध्यरात्री विषारी वायू गळतीची दुर्घटना घडली होती. लॉक डाऊनच्या काळात ही घटना झाल्याने८ मे रोजी देशात खळबळ निर्माण झाली होती. पॉलिमर कंपनीच्या ५ कि.मी परिसरात वायू गळतीमुळे देशात चिंतेचे वातावरण पसरले होते. १२ लोकांचा मृत्यू झाल्याने केंद्र शासनाने यामध्ये वेळीच लक्ष घातल्याने मोठी हानी टळली. या वायूगळती रोखण्यसाठी मुंबईच्या डोर्फ केटल केमिकल कंपनीने त्यांच्या विशेष रासायनिक आयुधे शासनाला हस्तांतरीत केली. भारतीय वायू सेनादलाने ही रासायनिक आयुधे विशाखापट्टनममध्ये दाखल झाल्याने वेळीच मोठी हानी टळली.
वायूगळतीचे मृत्यृतांडव ७ मेला सुरू होताच केंद्र व राज्य शासनाकडून युध्द पातळीवर मदतकार्य सुरू झाले. पंतप्रधान कार्यालय, औघोगिक व गृहमंत्रालय, आंध्रप्रदेशचे मुख्यमंत्री कार्यालय यानी तातडीने हालचाली सुरू केल्या. डोर्फ केटल कंपनी रासायनिक कारखान्यातील विषारी वायूंना निकामी करण्याचे केमिकल घटक बनवत असल्याने त्यांच्या मुंबई मुख्यालयात केंद्र शासनाच्या पदाधिकार्‍यांनी संपर्क साधला. डोर्फ केटल कंपनीच्या गुतराथमधील मुंद्रा प्लंन्टमधून हवाई मार्गाने वायूगळती निकामी करण्याचे केमिकल आंध्रला रवाना करण्यात आले. एल. जी. पॉलिमरच्या स्टिरीन वायू गळती होत असलेल्या १८ टन मूळ रसायन असलेल्या टाकीमध्ये वैज्ञानिक पध्दतीने डोर्फ केटलचे केमिकल घटक टाकण्यात आले. यामुळे विषारी वायू गळती तर थांबलीच त्याच बरोबर भविष्यात पुन्हा अशी गळती होणार नाही याची व्यवस्थाही करण्यात आली.
कोरोना लॉकडाऊन काळात डोर्फ केटल केमिकल कंपनीने मोजक्या कर्मचार्‍यांनी सामाजिक अंतर राखून वायू सेनादलाकडे रासायनिक आयुधे दिली. या डोर्फ केटलच्या राष्ट्रिय आपत्ती निर्मूलनाच्या कार्याचे देशभरात कौतुक होत आहे. भारत सरकारच्या विनंतीनुसार डोर्फ केटल कंपनीचे संस्थापक सुबोध मेनन यांनी तातडीने हालचाली करून महाराष्ट्रातून आंध्र प्रदेशला मोठी मदत केल्याने त्यांचे देशातून आभार व्यक्त केले जात आहे.
आणीबाणीच्या आपत्ती निवारण काळात डोर्फ केटलसह भारतीय वायूदलाच्या दोन वाहतूक विमानांनी सहभाग घेतला. राज्य व केंद्र शासन यांच्या तत्पर निर्णायामुळे वेळीच विषारी वायू गळती थांबली अन्यथा विशाखापट्टनम दुसरे भोपाळ होणाचा धोका होता. भोपाळ व विशाखापट्टनममधील वायू गळती घटना पुन्हा होऊ नये म्हणून भविष्यात रासायनिक कारखाने, पर्यावरण नियंत्रण मंडळाने पर्यावरण कायदा व नियमांची काटेकार अंमलबजावणी करण्याची गरज असून यामुळे पर्यावरण व वित्त हानी टळेल असे देशभरातून बोलले जात आहे.

 396 total views,  1 views today

Leave a Reply

Your email address will not be published.