नागरिकांच्या सुरक्षतेसाठी वांगणी पोलिसांचे लक्ष
बदलापूर : कोरोना विषाणूने वांगणीमध्ये प्रवेश करू नये यासाठी वांगणी मध्ये पोलीस बंदोबस्त कडक करण्यात आला आहे. वांगणीमधून जाणाऱ्या कल्याण कर्जत महामार्गावरील वांगणी गावा जवळ पोलीस बंदोबस्त कडक करण्यात आलेला आहे. व्हॅनची कसून तपासणी करण्यात येत आहे.
बदलापूर कर्जत राज्यमहामार्गा दरम्यान येणाऱ्या वांगणी येथे मालाची ने आण करण्याऱ्या संशयीत वाहनांची सध्या ग्रामीण पोळी ठाण्याचे पोलिस निरीक्षक संदिप निगडे यांच्या मार्गदर्शनाखाली येथील पोलीस तपासणी करीत आहेत. संचार बंदी च्या काळात कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी कायद्याचे काटेकोरपणे पालन करून भर उन्हात येथील पोलीस आपले कर्तव्य बजावत आहेत. यात हवालदार चंद्रकांत फडतरे, पोलीस नाईक सी. ए. पाटील, ए. आर. मदगे आदी पोलीस अधिकारी, कर्मचारी वर्ग तपासणी करीत आहेत. त्यांच्या मदतीला ग्रामपंचयात कर्मचारी, स्थानिक तरुण तसेच पोलीस मित्र देखील सहकार्याची भूमिका बजावंताना दिसत आहे.
दिवसेंदिवस कोरोना व्हायरसचा वाढता आकडा पाहता देशात तिसऱ्यांदा संचार बंदी जाहीर करण्यात आली आहे. या संचार बंदी च्या काळात सर्वात जास्त कामाचा ताण आरोग्य विभाग व कायद्याचे रक्षण करणाऱ्यां पोलिसांच्या वाट्याला आला आहे. सरकार जसं जसं नियम व अटी लागू करत आहे. तसं तसे पोलिसांना आपल्या कार्यपद्धतीत बदल करावा लागत आहे. ना वेळच्या वेळी खानपान, ना घरी परतण्याची निश्चित वेळ. अशा गंभीर परिस्थितीत पोलीस यंत्रणा सज्ज राहून नागरिकांच्या सुरक्षतेसाठी काम करीत आहे.
सध्या ग्रामपंचायत हद्दीत येणाऱ्या वांगणी पोलीसांवर देखील कामाचा अतिरिक्त ताण पडला आहे. रोजच्या गुन्ह्यांचा आढावा घेण्यासह विभागातील नगरिकांनी मास्क लावले की नाही याच्या आढाव्या बरोबरच भर उन्हात उभे राहून मुख्य रस्त्यावरुन धावणाऱ्या संशयीत वाहनांची तपासणी व कारवाई अशी अनेक कामे या पोलिसांना करावी लागत आहेत.
477 total views, 1 views today