क्यूरे रूग्णालय कोरोना कोव्हीड-१९ रुग्णालय म्हणून घोषित


कोव्हीड बाधितांसाठी शहरात विविध रूग्णालयांत ६५० खाट क्षमतेची निर्मिती

ठाणे : ठाणे महानगरपालिका क्षेत्रात कोरोना कोव्हीड १९ चा वाढता संसर्ग लक्षात घेवून कोव्हीड १९ बाधित रुग्णांना उत्तम प्रकारच्या वैद्यकीय सोयी उपलब्ध होणेसाठी आता ठाण्यातील घोडबंदर रोड येथील क्यरे रुग्णालय हे देखील कोरोना कोव्हीड – १९ रुग्णालय म्हणून घोषित करण्याचा निर्णय आज महापालिका आयुक्त विजय सिंघल यांनी घेतला आहे. यामुळे क्यूरे रूग्णालयासह शहरातील विविध कोव्हीड रूग्णालयांमध्ये एकूण ६५० खाट क्षमतेची निर्मिती करण्यात आली आहे.

महाराष्ट्रामध्ये कोरोना कोव्हीड-१९ चा प्रसार मोठया प्रमाणात होत असल्याने व दैनंदिन कोरोना कोव्हीड १९ची लागण बऱ्याच नागरिकांना झाल्याचे वेळोवळी निदर्शनास येत असल्याने कोरोना कोव्हीड १९ बाधित नागरिकांना तातडीने इतर समाजातील नागरिकांपासून आयसोलेट करणे, उपचारासाठी रुग्णालयमध्ये स्वतंत्र विभागात दाखल करणे, रुग्णाच्या सर्व तपासण्या करणे, तसेच वेळोवेळी शासनाच्या मार्गदर्शक सूचनानुसार साथरोग नियंत्रणात आणण्यासाठी योग्य त्या उपाययोजना करणे इत्यादी कारणासाठी कोव्हीड-१९ कोरोना रुग्णालय म्हणून घोषीत करणे आवश्यक असून त्यानुसार क्यूरे रूग्णालय कोव्हीड रूग्णालय घोषित करण्यात आले आहे.

दरम्यान कोव्हीड बाधितांवर चांगल्या पद्धतीने उपचार व्हावेत यासाठी ठाणे महानगरपालिका क्षेत्रातील जिल्हा सामान्य रुग्णालय (२५० खाटा ), कौशल्या रुग्णालय (६० खाटा), होरायझॉन रुग्णालय( ६०खाटा), वेदांत रुग्णालय (१०० खाटा) काळसेकर रुग्णालय (१०० खाटा), ठाणे हेल्थ केअर रुग्णालय (५३ खाटा ) आणि आता क्यूरे रूग्णालय कोव्हीड रूग्णालय म्हणून घोषित करण्यात आलेले आहे.

त्याचप्रमाणे ठाणे महानगरपालिका क्षेत्रातील बेथनी रुग्णालय या ठिकाणी नवीन इमारतीमध्ये सध्या एकूण ३४ खाटांची सुविधा निर्माण केली असून यामध्ये कोमॉर्बिड संशयित रुग्णांवर उपचार करण्यात येत आहेत. तसेच छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालय, कळवा येथे २० खाटांचा कोमॅार्बिड सस्पेक्टेड आयसोलेशन वॉर्ड निर्माण करण्यात आलेला आहे. जिल्हा सामान्य रुग्णालय या ठिकाणी २५ खाटांची सुविधा कोमॉर्बिड सस्पेक्टेड रुग्णांसाठी निर्माण करण्यात आलेली आहे. असे एकूण ७९ खाटांची क्षमता सध्या कोमॅार्बिड सस्पेक्टेड रुग्णांसाठी उपलब्ध करण्यात आली आहे.

ठाणे महापालिका क्षेत्रात दैनंदिन रुग्णांच्या संख्येत वाढ होत असल्याने अतिरिक्त रुग्णांची व्यवस्था होणे आवश्यक आहे तसेच कोव्हीड सस्पेक्टेड रुग्णालयातील जे रुग्ण कोव्हीड – १९ तपासणी नंतर पॉझीटीव्ह येतील असे सर्व रुग्ण इतर ठिकाणी सिम्टोमेटीक असिम्टोमॅटिक रुग्ण वर्गवारी करुन त्यांना त्या त्या फॅसिलिटी सेंटरमध्ये पाठविले जातात.

कोव्हीड असिम्टोमॅटीक रुग्णांची संख्या जास्त असल्याने अशा रुग्णांना व ज्या रुग्णांचे वयोमान ५० वर्षापेक्षा जास्त आहे अशा रुग्णांना वैद्यकिय तज्ञांच्या देखरेखीखाली उपचारार्थ ठेवणे आवश्यक आहे. त्यामुळे ठाणे महानगरपालिकेच्या क्षेत्रातील घोडबंदर रोड येथे क्युरे रुग्णालयकोव्हीड रूग्णालय म्हणून घोषित करण्यात आले आहे. या रूग्णालयामध्ये १७ सिंगल बेडस्, २ डबल बेडस्, १ ट्रिपल बेड असे एकूण २० बेडस् उपलब्ध आहेत. तसेच जनरल वॅार्ड ०४ बेड व आय.सी.यु. ०३ बेड अशी सुविधा उपलब्ध आहे. असे एकूण २७ बेडस् उपलब्ध आहेत. या सर्व सुविधांसह क्यूरे रुग्णालय कोरोना कोव्हीड – १९ रुग्णालय म्हणून घोषित करण्यात आले आहे.

राज्यात साथरोग प्रतिबंधात्मक कायदा १८९७ १३ मार्च २०२० पासून लागू करण्याची अधिसूचना निर्गमित केलेली आहे. सदर कायद्यातील तरतूदीनुसार कोरोना कोव्हीड – १९ साथरोग बाधित रुग्णांच्या उपचारासाठी ठाणे हेल्थ केअर रुग्णालय कोरोना कोवीड – १९ रुग्णालय म्हणून घोषित करण्यात आले आहे.

 493 total views,  2 views today

Leave a Reply

Your email address will not be published.