शिवा संघटनेचे प्रा.मनोहर धोंडे यांना भाजपतर्फे विधान परिषदेची उमेदवारी द्या

शिवा संघटनेला मित्र पक्ष म्हणून भाजपने दिलेला शब्द निदान आता तरी पाळावा असे संघटनेचे आवाहन

   मुंबई : शिवा संघटनेला विधानसभेच्या ५ जागा, विधान परिषदेची १ जागा आणि महामंडळावर सदस्यत्व द्यायच्या अटीवर लोकसभा निवडणुकीच्या अगोदर १० एप्रिल २०१९ ला शिवा संघटना-भाजप ची युती झाल्याची घोषणा मंत्रालया समोरील यशवंतराव चव्हाण सभागृह, मुंबई येथे केंद्रीय रेल्वे मंत्री मा.पियुष गोयल आणि विनोद तावडे यांच्या सोबत शिवा संघटनेच्या झालेल्या पत्रकार परिषदेत पाठिंबा जाहीर केला.

पण विधानसभा निवडणुकीत शिवा संघटनेला एकही जागा दिली नाही आणि एकही महामंडळ दिले नाही. तरी पुन्हा चंद्रकांत पाटील, देवेंद्र फडणवीस, विनोद तावडे, विजय पुराणीक यांनी विधान परिषदेत प्रतिनिधित्व देऊ असे सांगितल्यामुळे पुन्हा शिवा संघटनेच्या राज्य पदाधिकाऱ्यांची १० आॅक्टोबर २०१९ रोजी मंत्रालया समोरील यशवंतराव चव्हाण सभागृह, मुंबई येथे मिटिंग घेऊन भाजपवर विश्वास ठेवत पुन्हा विधानसभेलाही शिवा संघटनेने भाजपला जाहीर  पाठिंबा दिला. त्याचा भाजपला मोठा फायदाही झाला. त्यामुळे आता तरी भाजपने दिलेला शब्द आता तरी पाळुन विधान परिषदेची १ जागा शिवा संघटनेला देऊन प्रा.मनोहर धोंडे  यांची उमेदवारी जाहीर करावी अशी मागणी शिवा संघटनेचे राज्य सरचिटणीस रूपेश होनराव यांनी भाजप मित्र पक्षांकडे त्यांच्या प्रमुख पदाधिकारी यांच्याशी संवाद साधुन केली आहे.

प्रा. मनोहर धोंडे विधान परिषदेवर निवडून आल्यास त्याचा फायदा भविष्यात भाजप व भाजपच्या मित्र पक्षांना खूप मोठ्या प्रमाणात होणार आहे. त्यामुळे वीरशैव-लिंगायत समाज भाजपा व त्यांचे मित्र पक्षांच्या नेहमी पाठीशी असणार आहे त्यामुळे भविष्याचा विचार करता भाजपने प्रा.मनोहर धोंडे यांना विधान परिषदेवर घ्यावे अशी मागणी शिवा संघटनेसह वीरशैव-लिंगायत समाजात जोर धरु लागली आहे.

 1,090 total views,  1 views today

Leave a Reply

Your email address will not be published.