मुख्यमंत्री सहाय्यता निधीला भाजीपाला व्यापाऱ्यांची एक लाख एक हजार रुपयांची मदत

कल्याण कृषी उत्पन्न बाजार समितीच्या व्यापाऱ्यांनी तहसीलदारांना दिला डीडी
कल्याण : पकोरोनाने संपूर्ण विश्वात थैमान घातले आहे. या संकटाला राज्य शासन, प्रशासन आणि जनतेने सर्वांनी एकत्रितपणे सामोरे गेले पाहिजे. या दृष्टीकोनातून राज्य सरकारला समाजातील प्रत्येक स्थरातून मुख्यमंत्री सहाय्याता निधीला मदत करण्याचे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले होते. या आवाहनाला प्रतिसाद देत कल्याण शहरातील फळे – भाजीपाला घाऊक विक्रेता संघाच्या व्यापाऱ्यांनी तब्बल १ लाख १ हजार रुपयांची मदत कल्याण तालुक्याचे तहसीलदार दीपक आकडे यांच्याकडे सोपवली. यावेळी शिवसेनेचे विधानसभा संघटक दीपक सोनळकर, कल्याण कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक मोहन नाईक, कल्याण कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक धोंडिभाऊ (बाबाजी) पोखरकर, व्यापारी सदाशिव टाकळकर, बाळासाहेब करंडे, रंगनाथ विचारे, शिवाजी जोरी आदी व्यापारी उपस्थित होते.
दरम्यान यावेळी तहसीलदार आकडे यांनी मदतीचा डीडी स्विकारुन व्यापाऱ्यांचे शासनाच्यावतीने आभार मानले. व्यापाऱ्यांनी मदती बरोबर राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना तहसीलदार आकडे यांच्यामार्फत निवेदन देण्यात आले. या निवेदनाव्दारे व्यापाऱ्यांनी कोरोनाला हरवण्यासाठी महाराष्ट्र शासन आणि प्रशासनच्या कार्याचे कौतुक केले असून शासनाला कायम सहकार्य असल्याचे कळविले आहे.

 327 total views,  1 views today

Leave a Reply

Your email address will not be published.