मुंबईकर आणि व्यापारी विरोधी निर्णय राज्यसरकारने मागे घ्यावा

भाजपा नेते आमदार अँड आशिष शेलार यांची मागणी

मुंबई : दारुच्या दुकानांसमोर गर्दी होते म्हणून पुन्हा मुंबईतील सर्वच दुकाने बंद करण्याचा पालिकेचा निर्णय म्हणजे एक बोट दुखते म्हणून अख्खा हातच कापून टाकल्या सारखे आहे. राज्य शासन मुंबईकरांची गैरसोय तर करते आहेच पण छोट्या व्यापाऱ्यांनाही मारते आहे. राज्य सरकारने मुंबईकर आणि व्यापारी विरोधी निर्णय मागे घ्यावा अशी मागणी भाजपा नेते आमदार अँड आशिष शेलार यांनी केली आहे.
मुंबईत गेले दोन दिवस दारुची दुकाने उघडण्याची परवानगी देण्यात आली. वास्तविक महसूलात वाढ व्हावी या उद्देशाने दारुची दुकाने उघडण्याची घाई राज्य शासनाने केली. त्याबाबत उत्पादन शुल्क विभागाने नियोजन ही केले नाही, त्यामुळे स्वाभाविक पणे दारूच्या दुकानांसमोर गर्दी झाली त्याचा ताण पोलीस यंत्रणेवर आला आरोग्याच्या दुष्टीने आवश्यक नियम पाळले गेले नाहीत. म्हणून तातडीने हा निर्णय बदलण्याची नामुष्की आली. त्यासोबत
मुंबईतील सर्वच दुकाने बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला. जिवनाश्यक वस्तू, भाजी, मेडिकल सुरु ठेवणे अपेक्षित असले तरी पोलीसांनी अनेक भागात हि दुकाने ही बंद करण्यास भाग पाडले. तर पंख्याची, गारमेंट अशा रोजच्या उपयोगातील दुकांनांना ही दारु दुकानांबरोबर ही बंदी घालण्यात आली आहे. त्यामुळे यातून पुन्हा मुंबईकरांचीच गैरसोय झाली आहे. छोटा व्यापारी आधीच लाँगडाऊन मुळे उध्वस्त झाला आहे त्याला उभारी देण्याची गरज आहे, तर दैनंदिन कपडे ही नागरिकांना उपलब्ध करून देण्याची गरज आहे, पण याचा कोणताही विचार न करता सरकार निर्णय घेतला आहे. दारु दुकाने सुरु करताना सरकार घाई करते आहे, असे आम्ही लक्षात आणून दिले होते. त्यामुळे आता दारु दुकानांंचा निर्णय काय घ्यायचा तो घ्या पण अन्य जीवनावश्यक वस्तूं , दैनंदिन वापरातील वस्तू मात्र उपलब्ध करुन देणारी दुकाने सुरु करा,अशी मागणी आमदार अँड आशिष शेलार यांनी सरकारकडे केली आहे.

 332 total views,  1 views today

Leave a Reply

Your email address will not be published.