पोलिसांच्या वाहनांच्या निर्जंतूकीकरणासाठी एमजी मोटरचा पुढाकार

४ हजार पोलिसांच्या वाहनांची विनामूल्य स्वच्छता केली जाणार आहे

मुंबई : समाज सेवेप्रती वचनबद्ध असलेल्या एमजी मोटर इंडियाने पोलिस वाहनांमधील धूळ, कार वॉश, केबिन रिफ्रेश आणि हाय टच पॉइंट्स (इंटेरिअर व एक्सटेरिअर)चे निर्जंतुकीकरण करण्याचा उपक्रम हाती घेतला आहे. या उपक्रमाअंतर्गत आजपासून एमजी मोटरच्या सेवा केंद्रांवर सुमारे ४ हजार पोलिसांच्या वाहनांची विनामूल्य स्वच्छता केली जाणार आहे.

पोलिसांना पाठींबा देण्यासाठी हाती घेण्यात आलेल्या या उपक्रमाच्या माध्यमातून कारधारकांची संपूर्ण काळजी आणि स्वच्छता सुनिश्चित करण्यासाठी वाहनांच्या केबिनला धूळविरहीत करण्याचे काम सुरु केले आहे. या तंत्रप्रणालीत बाष्प वापरून कारच्या आतील भागातील कोपऱ्यांसह स्वच्छ व निर्जंतूक केला जातो. यात कारच्या इंटेरिअर सर्फेसला कोणतीही हानी होत नाही. तसेच यामुळे सूक्ष्मजीव व इतर कण काढून टाकले जातात.

एमजी मोटर इंडियाचे अध्यक्ष व्यवस्थापकीय संचालक, राजीव छाबा म्हणाले, ‘विशेषत: सध्याच्या या कठीण काळात पोलिस खात्याने पत्करलेल्या जोखीमीची आम्हाला जाणीव आहे. त्यांना पाठींबा देण्याचा आमचा प्रयत्न असून यासाठीच पोलिसांच्या वाहनांना धूळविरहीत करत आम्ही काही पावलं पुढे जात आहोत. यामुळे या वाहनांचे केबिन पूर्णपणे निर्जंतूक होतील. या उपक्रमात एमजी मोटर इंडियाला पाठींबा देण्यासाठी पुढे सरसावल्याबद्दल आम्ही आमच्या डीलर्सचे आभारी आहोत. मे २०२० च्या अखेरपर्यंत त्यांच्या सर्व्हिस स्टेशनवर ब्रँडची पर्वा न करता पोलिसांच्या वाहनांची पूर्ण स्वच्छता करण्याकरिता अद्ययावत सेफ्टी प्रोटोकॉलनुसार, ते पोलिसांसोबत काम करतील.’

एमजी मोटर इंडियाने एक्स्टेरिअर आणि इंटेरिअरसहित कार स्वच्छतेला पाठींबा देण्यासाठी टॉप कार डिटेलिंग एजन्सी (3M & Wuerth) सोबत पार्टनरशिप केली आहे. हा उपक्रम व्यापा-यांसाठी पूर्णपणे सुरक्षित आणि संरक्षित अनुभव असेल. पृष्ठभागाचे नैसर्गिक स्टरलायझेशन होण्यासाठी सिंगापूरमधील मेडक्लिन या कंपनीसोबत टाय अप केले आहे. फ्युमिगेशन, कार वॉश, केबिन रिफ्रेशिंगद्वारे संपूर्ण कारचे सॅनिटायझेशन करणे हे न्यू नॉर्मल जीवनात अत्यंत महतत्वाचे ठरेल, असा विश्वास एमजी मोटर इंडियाला आहे.

 523 total views,  1 views today

Leave a Reply

Your email address will not be published.