महाराष्ट्र राज्य खो-खो संघटना व श्री शिवाजी महाविद्यालय परभणी यांचा संयुक्त उपक्रम
परभणी : महाराष्ट्र राज्य खो-खो संघटना व श्री शिवाजी महाविद्यालय परभणी यांच्या वतीने ५ ते १३ मे दरम्यान ऑनलाइन खो-खो प्रशिक्षण व मार्गदर्शन कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे.
देशात सर्वत्र कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव व प्रतिबंधात्मक उपाययोजनांसाठी लॉकडाऊनची स्थिती आहे . अशा परिस्थितीत खेळाडू, प्रशिक्षक ,मार्गदर्शक यांचे ज्ञान अद्ययावत करण्यासाठी राज्य खो-खो संघटना व श्री शिवाजी महाविद्यालयाने हा उपक्रम हाती घेतलेला आहे.
या कार्यशाळेत दररोज खो-खो खेळातील तज्ञ विविध विषयावर सखोल असे मार्गदर्शन करणार आहेत.
ता. ५ मे रोजी खो-खो खेळाचा इतिहास आणि विकास या विषयावर अँड. अरुण देशमुख (मुंबई),
ता. ६ मे रोजी खो-खो खेळाचे मानसशास्त्र या विषयावर डॉ. अमित प्रभू (पुणे ),
ता. ७ मे रोजी खो -खो खेळाचे अध्यावत नियम व क्रीडांगणाची मापे याविषयी डॉ.नरेंद्र कुंदर (मुंबई ),
ता. ८ मे रोजी खो-खो तील सुरुवातीचा व नंतरचा व्यायाम प्रकार याविषयी परभणी येथील प्रवीण चाळक,
ता. ९ मे रोजी एन आय एस कोच डॉ. संजय मुंडे (परभणी) हे खो-खो खेळातील आक्रमक कौशल्य,
ता. १० मे रोजी डॉ. प्रशांत इनामदार (सांगली) हे संरक्षणात्मक कौशल्ये व त्याच दिवशी बिपीन पाटील (पुणे) हे शॅडो प्रॅक्टीस व खेळातील बारकावे सांगतील,
ता. ११ मे रोजी खो-खोतील सर्वसामान्य इजा, प्रतिबंध व उपचार या विषयावर मिरज येथील डॉ. अमित रावते,
ता. 12 मे रोजी खेळाडूंच्या आदर्श आहाराविषयी परभणी येथील डॉक्टर ज्योती सोळुंके या मार्गदर्शन करणार आहेत तर
ता. 13 मे रोजी खो-खो महासंघाचे डॉ. चंद्रजित जाधव (उस्मानाबाद ) हे सर्व कार्यशाळेचा आढावा व निष्कर्ष सादर करणार आहे.
अधिक माहितीसाठी कार्यशाळेचे समन्वयक प्रा. डॉ. संतोष सावंत (9823144533) व जिल्हा खो खो संघटनेचे कार्यध्यक्ष प्रा. संतोष कोकीळ (9860986071) यांच्याशी संपर्क साधावा. या कार्यशाळेत मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन, राज्य खो खो संघटनेचे अध्यक्ष संजीवराजे निंबाळकर, खो-खो फेडरेशनचे सहसचिव डॉ. चंद्रजीत जाधव, राज्य संघटनेचे सचिव गोविंद शर्मा (औरंगाबाद) परभणी जिल्हा खो-खो संघटनेचे अध्यक्ष अँड. बाळासाहेब जामकर व शिवाजी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. बाळासाहेब जाधव यांनी केले आहे.
912 total views, 1 views today